रोहित शर्मा भारतातील लालिगाचा पहिला ब्रॅण्ड अम्बेसिडर

रोहित शर्मा भारतातील लालिगाचा पहिला ब्रॅण्ड अम्बेसिडर

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा

आधुनिक काळातील जगाच्या अव्वल फलंदाजांपैकी एक आणि फूटबॉलप्रेमी रोहित शर्माने लालिगा या स्पेनच्या टॉप डिव्हिजन फूटबॉल लीगसोबत जोडला गेला आहे. तो भारतातील या लीगचा ब्रॅन्ड अम्बेसिडर बनला आहे. लीगच्या इतिहासामध्ये त्यांच्याासोबत जोडणारा तो पहिला नॉन-फूटबॉलर खेळाडू आहे. लालिगाने २०१७ पासून भारतात राबवलेल्या प्रमुख उपक्रमांच्या शृंखलेनंतर रोहितला आता येथे नियुक्त करण्यात आले आहे.

रोहित शर्मा हा जगातील धडाकेबाज फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. सध्या् आयसीसीच्या जागतिक क्रमवारीमध्ये दुस-या स्थांनावर असलेल्या या फलंदाजाने ५० षटकांच्या सामन्यामध्ये ३ द्विशतके ठोकली आहेत. खेळाच्या् इतिहासामध्ये अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. तसेच त्याच्या नावे २६४ धावा करण्याचा जागतिक विक्रम देखील आहे. भारतातील लालिगाचा चेहरा आणि एक कुशल कर्णधार असलेल्या रोहित शर्मामध्ये लालिगा ज्यासाठी ओळखली जाते ते पैलू सामावलेले आहेत, ते म्हणजे सर्वोत्तमता, सांघिककार्य, अस्स्लता, आदर, कटिबद्धता आणि आवड. देशात एक व्यक्ती व खेळाडू म्हाणून प्रेरणादायी प्रतिमा असलेला रोहित देशभरात फूटबॉल खेळ विकसित होण्यासाठी उत्प्रेरकाची भूमिका बजावेल.

लालिगाने २०१७ पासून भारतात या खेळाला वाढवण्यासाठी आणि ब्रॅण्डचे नावलौकीक करण्यासाठी केंद्रित प्रयत्ने केले आहेत. दोन वर्षांमध्ये लालिगाने भारतात त्यांचे कार्यालय सुरू केल्यासपासून लीगने विविध प्रमुख उपक्रम राबवले आहेत, जसे तळागाळापर्यंत पोहोचणारा अद्वितीय उपक्रम, लालिगा फूटबॉल स्कूल्स, भारतीय प्रेक्षकांना मोफत ३०० हून अधिक सामने पाहण्याचा आनंद देण्यासाठी फेसबुकसोबत प्रसारण भागीदारी, भारतात पहिल्यांदाच अव्व‍ल युरोपियन क्लब गिरोना एफसीचे दाखलीकरण. रोहित शर्मासोबतचा सहयोग हा लीगचा आणखी एक प्रमुख उपक्रम आहे. या सहयोगाच्या माध्यमातून भारतात फूटबॉल खेळाला मिळत असलेल्या प्रसिद्धीला अधिक वाढवण्या‍चा प्रयत्न‍ करण्या‍त येणार आहे.

या सहयोगाबाबत बोलताना लालिगा इंडियाचा ब्रॅन्ड अम्बेसिडर रोहित शर्मा म्हणाला की, ”भारतातील फूटबॉल जागतिक दर्जाचे बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या खेळाला आता ‘स्ली पींग जाइण्ट’ मानले जात नसल्या्चे पाहून खूपच चांगले वाटत आहे. गेल्या ५ वर्षांच्याा कालावधीमध्ये भारतात फूटबॉलप्रती आवडीमध्ये लक्षणीय वाढ होताना दिसून आली आहे. मला लालिगासोबत जोडण्याचा आनंद होत आहे. स्पॅनिश जाइण्ट्ने त्यांच्या तळागाळातील उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय फूटबॉल इकोप्रणालीमध्ये प्रवेश केल्याचे पाहून प्रेरणादायी वाटत आहे. मी या सुंदर खेळाचा आनंद घेण्यासाठी लालिगासोबत रोमांचपूर्ण प्रवास सुरू करण्यासाठी उत्सुक आहे. मी भारतातील फूटबॉल चाहत्यांशी जोडले जाण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.”

First Published on: December 13, 2019 8:57 AM
Exit mobile version