सायना नेहवाल कोरोना पॉझिटिव्ह; थायलंड ओपन स्पर्धेआधीच भारताला धक्का

सायना नेहवाल कोरोना पॉझिटिव्ह; थायलंड ओपन स्पर्धेआधीच भारताला धक्का

सायना नेहवालला कोरोनाची लागण

थायलंड ओपन स्पर्धेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे. स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला कोरोनाची लागण झाली आहे. सायनाला रुग्णालयातच क्वारंटाीन करण्यात आलं आहे. सायना थायलंड ओपनसाठी भारतीय खेळाडूंसोबत थायलंडला गेली आहे. १२ जानेवारीपासून थायलंड ओपन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेाधीच सायनाला कोरोनाची लागण झाल्याने सायनासह भारताला धक्का बसला आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे सायनाला मोठा धक्का बसला आहे. कारण, १२ ते १७ जानेवारी पर्यंत योनेक्स थायलंड ओपन स्पर्धा होणार आहे. त्यानंतर १९ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान टोयोटा थायलंड ओपन आणि २७ ते ३१ जानेवारी दरम्यान BWF वर्ड टूर फायनल्स होणार आहेत. कोरोनाच्या महामारीनंतर १० महिन्यांनी सायना नेहवाल बॅडमिंटनच्या कोर्टवर उतरणार होती.

First Published on: January 12, 2021 11:56 AM
Exit mobile version