पाळणा हलला? साक्षीने शेअर केलेल्या फोटोमुळे धोनी बाबा बनल्याची चर्चा

पाळणा हलला? साक्षीने शेअर केलेल्या फोटोमुळे धोनी बाबा बनल्याची चर्चा

पाळणा हलला? साक्षीने शेअर केलेल्या फोटोमुळे धोनी बाबा बनल्याची चर्चा

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने ३० जुलै रोजी बाबा झाल्याची गोड बातमी दिली. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा बाबा बनल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या चर्चेला साक्षीने शेअर केलेला फोटो जबाबदार आहे. या फोटोमुळे धोनी आणि साक्षीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच हा फोटो सध्या सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

साक्षीने शेअर केलेल्या फोटोमध्ये दुसरं तिसरं कोणी नसून मुलगी जिवा आहे. यामध्ये जिवाच्या मांडीवर एक लहान बाळ दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी धोनी आणि साक्षी पुन्हा एकदा आई-बाबा झाल्याचा अंदाज लावून त्यांचे अभिनंदन करत आहे. तसेच दुसऱ्या बाजूला अनेक जण जिवाच्या मांडीवर ज्युनियर पांड्या असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत.

या काळात धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर नेहमी Active असते. लॉकडाऊनच्या काळात धोनी त्याच्या रांची येथील फार्म हाऊसवर कसा वेळ घालवत आहे, हे साक्षीच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे कळते. सध्या धोनी सेंद्रीय शेती करत असल्याचे वृत्त समोर आले होते. यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल देखील झाले होते. दरम्यान धोनी ९ जुलै रोजी झालेल्या विश्वचषक उपांत्य सामन्यात न्यूझीलंडनकडून भारताचा पराभव झाल्यापासून कोणत्याही सामन्यात खेळलेला नाही. धोनीला बीसीसीआयच्या करार यादीतून वगळण्यात आले आहे.


हेही वाचा – VIDEO : ‘कॅप्टन कूल’ धोनी वळला शेतीकडे!


 

First Published on: August 11, 2020 2:05 PM
Exit mobile version