गर्भारपणातही सानियाने पेलले फिटनेस चॅलेंज

गर्भारपणातही सानियाने पेलले फिटनेस चॅलेंज

वर्कआऊट करतांना सानिया

भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झा आक्टोबरमध्ये बाळाला जन्म देणार आहे. मात्र गर्भारपणामध्येही सानियाने तिला दिले गेलेले फिटनेस चॅलेंज पूर्ण करून त्याचा व्हिडीओ सोल मीडियावर पोस्ट केला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सुरु केलेली फिटनेस चॅलेंज मोहीम सोशल मीडियावर चांगलीच जोर पकडते आहे. यात सानिया मिर्झाने तिला मिळालेले चॅलेंज पूर्ण करून व्हिडीओ पोस्ट करताना राठोड यांना धन्यवाद दिले आहेत. या मोहिमेमुळे सर्वाना फिटनेससाठी प्रोत्साहन मिळाले असल्याचेही तिने म्हटले आहे.

सानिया म्हणते या मोहिमेत आम्हाला सहभागी करून घेतल्याचा आनंद वाटतो आहे. गरोदरपणातही स्वास्थ्यासाठी फिटनेस हवाच म्हणून हे चॅलेंज पूर्ण केले आहे. सानियाने क्रिकेटपटू युवराज सिंग, प्रियांका चोप्रा आणि अभिषेक बच्चन यांना पुढील चॅलेंजसाठी टॅग केले आहे.

गर्भवती असतानाही फीटनेसवर भर

यापूर्वीही केले होते ट्विट

यापूर्वीही आपण गरोदर असल्याची बातमी सानियाने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. सध्या सानिया ही सामन्यांमध्ये भाग घेत नसली तरीही ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे.

First Published on: May 30, 2018 11:55 AM
Exit mobile version