सौराष्ट्रने पहिल्यांदाच पटकावलं रणजीचं विजेतेपद

सौराष्ट्रने पहिल्यांदाच पटकावलं रणजीचं विजेतेपद

सौराष्ट्रने पहिल्यांदाच पटकावलं रणजीचं विजेतेपद

राजकोट येथे रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रने बंगालचा पराभव करत पहिल्यांदा रणजी चषकावर आपले नाव कोरले आहे. पहिल्या डावात ४४ धावांची आघाडी घेत सौराष्ट्रने रणजी करंडकावर नाव कोरले. सौराष्ट्र ४ वेळा रणजीच्या अंतिम सामन्यात पोहचवला परंतू रणजीचे विजेतेपद पटकावता आला नाही. मात्र, ५ व्या वेळेस बंगालवर मात करत स्वप्न पूर्ण केले.


हेही वाचा – २९ मार्च ऐवजी १५ एप्रिलपासून सुरू होणार आयपीएल


सौराष्ट्राने पहिल्या डावात बंगालसमोर ४२५ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात अर्पित वसवडाने शतक तर चेतेश्वर पुजारा, अवि बारोट, विश्वराज जडेजा या त्रिकुटाने अर्धशतकी खेळी करत सौराष्ट्रने बंगालवर वर्चस्व मिळवले. बंगालकडून आकाश दीपने ४, शाहबाझ ३, मुकेश कुमार २ आणि इशान परोलने १ गडी बाद केला. बंगालने प्रत्यूत्तरात चांगला खेळ करत १० गड्यांच्या मोबदल्यात ३८१ धावा केल्या. सौराष्ट्रतर्फे जडेजाने ३, कर्णधार उनाडकटने २, मनकडने २ तर सक्रिया आणि जानी यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

 

First Published on: March 13, 2020 3:14 PM
Exit mobile version