सिनियर महाराष्ट्र राज्य व आंतर जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

सिनियर महाराष्ट्र राज्य व आंतर जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

डावीकडून - शब्बीर खान, माधुरी तायशेटे, काजल कुमारी, मोहम्मद घुफ्रान

रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन आयोजित सिनियर महाराष्ट्र राज्य व आंतर जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीत मोहम्मद घुफ्रान, तर महिला एकेरीत काजल कुमारी या मुंबईच्या खेळाडूंनी जेतेपद पटकावले. पुरुष एकेरीत तिसर्‍या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या संदीप देवरूखकरने ठाण्याच्या राजेश गोहिलवर १८-११, १९-१८ अशी मात केली. महिलांमध्ये मुंबईच्या ऐशा खोकावालाने रत्नागिरीच्या मैत्रेयी गोगटेचा २४-०, १५-१४ असा पराभव करत तिसरा क्रमांक मिळवला.

पुरुष एकेरीचा अंतिम सामना मोहम्मद घुफ्रान आणि विश्वविजेता प्रशांत मोरे या दोन मुंबईच्या कॅरमपटूंमध्ये झाला. या सामन्यात घुफ्रानने २५-१०, २५-४ अशी बाजी मारत ही स्पर्धा जिंकली. काजल कुमारी आणि नीलम घोडकेला या मुंबईच्या खेळाडूंमधील महिला एकेरीचा अंतिम सामना चुरशीचा झाला.

या सामन्यात काजलने १२-२१, २५-७, २५-१५ असा निसटता विजय मिळवत या गटाचे जेतेपद पटकावले. त्याआधी वयस्कर गटात (५० वर्षांवरील) महिलांमध्ये माधुरी तायशेटे आणि पुरुषांमध्ये शब्बीर खान या मुंबई उपनगरच्या खेळाडूंनी अजिंक्यपद मिळवले.

First Published on: July 27, 2019 4:18 AM
Exit mobile version