Shardul Thakur Engagement : शार्दुल ठाकूरचा गर्लफ्रेंड मितालीसोबत झाला साखरपुडा ; शेअर केला VIDEO

Shardul Thakur Engagement : शार्दुल ठाकूरचा गर्लफ्रेंड मितालीसोबत झाला साखरपुडा ; शेअर केला VIDEO

Shardul Thakur Engagement : शार्दुल ठाकूरचा गर्लफ्रेंड मितालीसोबत झाला साखरपुडा ; शेअर केला VIDEO

जगभरात ‘लॉर्ड’ या नावाने प्रसिद्ध असणारा मुंबईचा लोकप्रिय खेळाडू शार्दुल ठाकूर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत मुंबईत साखरपुडा केला आहे. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये साखरपुडा सोहळा पार पडला आणि या कार्यक्रमाला फक्त जवळचे कुटुंबीयच उपस्थित होते. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषकानंतर ते विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा होत आहे.

शार्दुल ठाकूर भारतासाठी आतापर्यंत ४ कसोटी, १५ एकदिवसीय आणि  २४ टी-२० सामने खेळला आहे. या ३० वर्षीय गोलंदाजाने अलीकडच्या काळात शेवटच्या षटकांत आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत अर्धशतके झळकावून त्याने फलंदाज म्हणून आपली ओळखही मजबूत केली आहे. शार्दुलचा नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याला या स्पर्धेत केवळ २ सामने खेळण्याची संधी मिळाली.शार्दुल ठाकूर आणि रोहित शर्मा यांनी एकत्र अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

शार्दुल ठाकूर हा मूळचा मुंबईकर असूम, पालघरमधील रहिवासी आहे.  टीम इंडियामध्ये २०१७ साली त्याने पदार्पण केले. तर २०१८ मध्ये त्याचे कसोटी पदार्पण झाले. शार्दुलने आतापर्यंत कसोटीत १४, वनडेमध्ये २२ आणि टी-२० मध्ये ३१ बळी घेतले आहेत.

 


हे ही वाचा – Farm laws repeal bill 2021 : तीन कृषी कायदे रद्द करणारे विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर


 

First Published on: November 29, 2021 3:46 PM
Exit mobile version