IND vs NZ 1st Test : श्रेयस अय्यरने पदार्पणात झळकावले शतक; कित्येक विक्रम केले नावावर, असे करणारा ठरला १६वा भारतीय खेळाडू

IND vs NZ 1st Test : श्रेयस अय्यरने पदार्पणात झळकावले शतक; कित्येक विक्रम केले नावावर, असे करणारा ठरला १६वा भारतीय खेळाडू

न्यूझीलंडविरुद्धच्या २ कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येलाच कसोटी क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा डेब्यू करण्यात आला. त्याने आपल्या डेब्यू सामन्यातच शतक झळकावून कित्येक विक्रमांना गवसणी घातली आहे. अय्यरने कानपूर मधील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १५७ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि कसोटीच्या डेब्यू सामन्यात शतक झळकावणारा १६ वा भारतीय खेळाडू बनण्याचा मान पटकावला. तर अय्यर तिसरा फलंदाज बनला आहे ज्याने आपल्या डेब्यू सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शतक ठोकले आहे. तो सर्वांत कमी वयाच्या खेळाडूंच्या यादीमध्ये हा विक्रम करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. अय्यरने वयाच्या २६ वर्षे आणि ३५५ दिवसांत ही कामगिरी केली आहे.

श्रेयस अय्यरने हे शतक १५७ चेंडूत पूर्ण केले, जे कसोटी सामन्याच्या दृष्टीने सर्वात जलद शतक मानले जाऊ शकते. या कसोटीत त्याने भारतासाठी आणि जगातील चौथ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून सर्वात जलद कसोटी शतक झळकावले आहे. भारतासाठी हा विक्रम माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावावर आहे, त्यांनी 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ७४ चेंडूत शतक झळकावले होते.

न्यूझीलंडविरुद्धच्या चालू मालिकेत श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान मिळाले आहे. या संघात अनेक वरिष्ठ खेळाडू संघातून बाहेर आहेत. त्यामुळे त्याच्यासारख्या युवा खेळांडूना संधी मिळाली. त्याला कानपूर कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली दिग्गज क्रिकेटर सुनिल गावस्कर यांनी त्याला कसोटी कॅप प्रदान केली.

पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारे भारतीय खेळाडू

१. लाला अमरनाथ (वि. इंग्लंड 1933)
2 दीपक शोधन (वि. पाकिस्तान १९५२)
3. अर्जन कृपाल सिंग (वि. न्यूझीलंड १९५५)
4. अब्बास अली बेग (वि. इंग्लंड 1959)
५. हनुमंत सिंग (वि. इंग्लंड 1964)
6. जी विश्वनाथ (वि. ऑस्ट्रेलिया १९६९)
७. सुरिंदर अमरनाथ (वि. न्यूझीलंड 1976)
8. मोहम्मद अझरुद्दीन (वि. इंग्लंड 1984)
९. प्रवीण अमरे (वि. दक्षिण आफ्रिका 1992)
10. सौरव गांगुली (वि. इंग्लंड 1996)
11. वीरेंद्र सेहवाग (वि दक्षिण आफ्रिका 2001)
१२. सुरेश रैना (वि. श्रीलंका 2010)
13. शिखर धवन (वि. ऑस्ट्रेलिया 2013)
14. रोहित शर्मा (वि. वेस्ट इंडिज 2013)
१५. पृथ्वी शॉ (वि. वेस्ट इंडिज 2018)
१६. श्रेयस अय्यर (वि न्यूझीलंड २०२१)

यापूर्वी श्रेयस अय्यर भारताकडून कसोटीमध्ये पदार्पण करणारा ३०३ नंबरचा खेळाडू ठरला आहे. अय्यर गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या कालावधीत क्रिकेट खेळले नव्हते. गेल्या वर्षी खांद्याच्या शस्त्रक्रियेमुळे तो अनेक महिने संघाबाहेर होता. तो २०१९ मध्ये इराणी ट्रॉफीमध्ये शेवटचा खेळला होता.

First Published on: November 26, 2021 1:10 PM
Exit mobile version