बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुली?

बीसीसीआयचा नवा अध्यक्ष सौरव गांगुली?

सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली; छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुली आता भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) चा पुढचा अध्यक्ष होण्याची शक्यता आहे अशी बातमी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे. सुप्रीम कोर्टानं नुकतंच लोढा समितीच्या बऱ्याच शिफारशी नाकारून संविधानाचा नवा ड्राफ्ट स्वीकारला आहे. या बदलानंतर सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्ष पदापर्यंत पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या असणारे आणि पूर्वीचे अधिकारी हे आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मागे फेकले गेले आहेत. तर सौरव गांगुली हा क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या अध्यक्षपदाचं तिसरं वर्ष भूषवित आहे.

सौरव गांगुली एकमेव व्यक्ती

‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार, बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सध्या केवळ सौरव गांगुली हे एकमेव नाव योग्य आहे. वास्तविक भारताचे मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानं ऑफिस पदाधिकाऱ्यांसाठी कूलिंग ऑफ क्लासमध्ये काही अटी शिथील केल्या आहेत. मात्र तरीही सध्याचे अध्यक्ष सी. के. खन्ना, कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी आणि खजिनदार अनिरुद्ध चौधरी हे पुढची निवडणूक लढवू शकणार नाहीत. तर आयपीएल गर्व्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष राजीव शुक्ला आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनादेखील ही निवडणूक लढता येणार नाही. या दोघांनीही आपापल्या राज्यात ९ वर्ष कार्य सांभाळलं आहे. त्यामुळं भारतीय बोर्डाचं लक्ष सध्या सौरव गांगुलीवर आहे. सौरव बीसीसीआयमध्ये बदल घडवून आणू शकेल असा विश्वास बोर्डाला आहे.

निवडणूक लढवू शकतो गांगुली

सौरव गांगुली गेल्या चार वर्षांपासून अॅडमिनिस्ट्रेटर असून बीसीसीआयचं अध्यक्षपद मिळवण्यासाठी निवडणूक लढू शकतो. बीसीसीआयच्या नव्या धोरणानुसार, अध्यक्षपदासाठी झोनल रोटेशन पॉलिसी नसेल. स्टेट असोसिएशनचा कोणताही प्रतिनिधी आपला उमेदवार निवडणुकीसाठी उभा करू शकतो. फक्त त्याला समर्थन मिळण्याची गरज आहे. गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यास, त्याला दोन वर्षांनी राजीनामा द्यावा लागेल, कारण तोपर्यंत त्याचा सहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होईल. बोर्डाच्या सदस्यांनुसार, गांगुलीच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयला स्थैर्य लाभेल.

First Published on: August 13, 2018 1:40 PM
Exit mobile version