सौरव गांगुलीवर पुन्हा अ‍ॅन्जिओप्लास्टी; हृदयाजवळ आणखी दोन स्टेंट!   

सौरव गांगुलीवर पुन्हा अ‍ॅन्जिओप्लास्टी; हृदयाजवळ आणखी दोन स्टेंट!   

बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर गुरुवारी पुन्हा अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. डॉक्टरांनी त्याच्या हृदयाजवळ आणखी दोन स्टेंट बसवले आहेत. छातीमध्ये दुखू लागल्याने बुधवारी गांगुलीला कोलकात्याच्या अपोलो ग्लेनिगल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गुरुवारी गांगुलीच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचा अहवाल आल्यावर पुढील उपचारांची दिशा ठरवली गेली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन गांगुलीची विचारपूस केली. ‘सौरवने माझ्याशी संवाद साधला. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर मी त्याच्याशी आणि त्याच्या पत्नीशी चर्चा केली,’ असे ममता बॅनर्जी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

वैद्यकीय चाचण्यांनंतर निर्णय

गांगुलीला बुधवारी पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गांगुलीवर काही दिवसांपूर्वीच अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्याची प्रकृती स्थिर होती. परंतु, छातीमध्ये दुखू लागल्याने बुधवारी त्याला कोलकात्याच्या अपोलो ग्लेनिगल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ‘गांगुलीला चक्कर येत होती आणि छातीत थोडे दुखत होते. त्यामुळे उपचारांसाठी त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले,’ असे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. गुरुवारी वैद्यकीय चाचण्यांचा अहवाल आल्यावर गांगुलीच्या हृदयाजवळ दोन स्टेंट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.


हेही वाचा – भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका झाली, हे खरे!


 

First Published on: January 28, 2021 7:05 PM
Exit mobile version