धोनीने आधीच दिली होती BCCI ला निवृत्तीची कल्पना, पत्रात लिहिलं होतं….

धोनीने आधीच दिली होती BCCI ला निवृत्तीची कल्पना, पत्रात लिहिलं होतं….

Dhoni

जी घडी येऊच नये अशी देशभरातले क्रिकेट चाहते प्रार्थना करत होते, ती घडी अखेर आली आहे. भारताचा माजी कर्णधार आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या रिटायरमेंटविषयी बरीच चर्चा सुरू होती. कोरोनामुळे आयपीएल आणि त्यापाठोपाठ टी-२० वर्ल्डकप देखील पुढे ढकलला गेला. या पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये खेळल्यानंतर धोनी पुढे वर्ल्डकपमध्ये खेळेल का? याविषयी निर्णय होईल असं वाटत असताना या दोन्ही स्पर्धा पुढे ढकलल्या गेल्यामुळे धोनीच्या पुढच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असतानाच कॅप्टन कूलने निवृत्तीची घोषणा केली आहे. परंतू धोनीने आपली निवृत्ती ही अचानक जाहीर केली नसून याबद्दल त्याने BCCI ला कल्पना दिली होती.

धोनीने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला पत्र लिहून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारणार असल्याचं सांगितलं. कोणत्याही भारतीय खेळाडूला निवृत्तीचा निर्णय जाहीर करण्याआधी बीसीसीआयला त्याची कल्पना द्यावी लागते. आजतकने दिलेल्या वृत्तानुसार धोनीनेही याचप्रमाणे बीसीसीआयला पत्र लिहून आपण निवृत्त होणार असल्याचं कळवलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असतो तरीही पुढची काही वर्ष आयपीएल खेळत राहणार असल्याचंही धोनीने यावेळी नमूद केलं.

२०१९ विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं. यानंतर सुमारे वर्षभर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. गेल काही महिने तो पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा सोबत रांची येथील फार्महाऊसमध्ये राहत आहे.

धोनी सध्या आगामी आयपीएलची तयारी करतो आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईमध्ये आयपीएल खेळल्या जाणार आहे. यासाठी आता धोनी सज्ज झाला आहे. सध्या आपल्या चेन्नई सुपरकिंग्जमधील सहकाऱ्यांसोबत तो सराव शिबीरात सहभागी झाला आहे. २० ऑगस्टनंतर चेन्नईचा संघ युएईला रवाना होणार आहे.


हे ही वाचा – झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची BCCI ला विनंती, धोनीसाठी अखेरचा सामना भरवा!


First Published on: August 16, 2020 10:15 AM
Exit mobile version