राज्याच्या विकासाबाबतचे विचार ऐकून खूप छान वाटले, सुरेश रैनाने घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट

राज्याच्या विकासाबाबतचे विचार ऐकून खूप छान वाटले, सुरेश रैनाने घेतली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट

भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्याने भेट घेतल्याचे फोटो देखील समोर आले आहेत. या फोटोनंतर सुरेश रैना राजकीय खेळी खेळण्याच्या तयारीत तर नाही ना असा प्रश्न चाहत्यांना पडणे स्वाभाविक आहे. परंतु सुरैश रैनाने स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

सुरेश रैनाने योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. आज माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. खेळ, युवकांबद्दलचे आणि राज्याच्या विकासाबाबतचे विचार ऐकून खूप छान वाटले. परमेश्वराकडे तुमच्या उत्तम स्वास्थ आणि आरोग्याची प्रार्थना करतो. राज्याला तुमचे अभुतपूर्व मार्गदर्शन अशाच प्रकारे मिळत राहो, असं ट्विट सुरेश रैनाने केलं आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिल्याने रैना चर्चेत आला होता. त्याला त्याची फ्रेंचायझी चैन्नई सुपर किंग्जने देखील विकत घेण्यात रस दाखवला नाही. त्यामुळे त्याने समालोचक म्हणून आपल्या नव्या कामगिरीला सुरूवात केली.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट घेतल्याने विविध तर्क लावले जात आहेत. २०२१च्या आयपीएलमध्ये सुरेश रैनाला साजेशी कामगिरीही करता आली नाही. रैनाने १२ सामन्यांत १६० धावाच केल्या होत्या. आयपीएलमध्ये एकूण २०५ सामन्यांत ३२.५१ च्या सरासरीने ५५२८ धावा केल्या आहेत. त्यात १ शतक आणि ३९ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने २५ विकेट्सही घेतल्या आहेत.


हेही वाचा : मुंबईमध्ये पावसाळ्यात समुद्राला मोठी भरती, २२ दिवस धोक्याचे


 

First Published on: April 19, 2022 9:03 PM
Exit mobile version