ज्युव्हेंटसला पराभवाचा धक्का

ज्युव्हेंटसला पराभवाचा धक्का

स्टार खेळाडू क्रिस्तिआनो रोनाल्डोने गोल करुनही ज्युव्हेंटस संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इटलीतील फुटबॉल स्पर्धा सीरिया एमध्ये हेलास व्हेरोना संघाने ज्युव्हेंटसवर २-१ असा विजय मिळवला. हा ज्युव्हेंटसचा २३ सामन्यांतील तिसरा पराभव होता. मात्र, ते अजून गुणतक्त्यात अव्वल स्थानी असून त्यांचे २३ सामन्यांनंतर ५४ गुण आहेत.
या सामन्याच्या मध्यंतराला गोलशून्य बरोबरी होती. मात्र, उत्तरार्धात सामन्यात रंगत आली. ६५ व्या मिनिटाला रोनाल्डोने गोल करत ज्युव्हेंटसला १-० अशी आघाडी मिळवून दिली. रोनाल्डोला सलग दहाव्या सामन्यात गोल करण्यात यश आले. तसेच हा त्याचा १० सामन्यांतील १५ वा गोल ठरला. परंतु, त्याने मिळवून दिलेली आघाडी ज्युव्हेंटसला फारकाळ टिकवता आली नाही. ७६ व्या मिनिटाला फाबिओ बोरीनीने गोल करत व्हेरोनाला बरोबरी करून दिली. तर ८६ व्या मिनिटाला पाझ्झीनी गोल केला आणि व्हेरोनाला २-१ असा विजय मिळवून दिला.

First Published on: February 10, 2020 1:44 AM
Exit mobile version