T-20 World Cup 2024 : कर्णधार रोहित शर्मा तर, हार्दिक पांड्या उपकर्णधार; टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर

T-20 World Cup 2024 : कर्णधार रोहित शर्मा तर, हार्दिक पांड्या उपकर्णधार; टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर

प्रातिनिधीक फोटो

Indian Cricket Team मुंबई : टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील भारतीय संघाचे कर्णधार पद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले असून, उप-कर्णधार हार्दिक पांड्याला करण्यात आले आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपासून लांब असलेल्या ऋषभ पंतचेही भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. शिवाय, यशस्वी जैस्वाल यालाही संधी देण्यात आली आहे. (T-20 World Cup 2024 Indian Cricket Team Announce For T20 World Cup)

टी-20 वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. यंदा वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्याकडे वर्ल्ड कपचे संयुक्त यजमानपद देण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी सर्व 20 संघ पात्र ठरले आहेत. टी-20 वर्ल्ड कप 2024 या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यात होणार आहे. तर क्रिकेट विश्वात क्रिकेट युद्ध म्हणून ओळखला जाणारा भारत-पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना 9 जून रोजी न्यू यॉर्क येथे पार पडणार आहे.

टी-20 च्या संघात हार्दिक पांड्याच्या निवडीवरून अधिक चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. रोहित शर्मासोबत सलामीला यशस्वी जैस्वाल याचे स्थान पक्के होते. विराट कोहली, सूर्यकुमार यादव हेही पक्के होते. यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून रिषभ पंत फ्रंट रनर असला तरी दुसरा यष्टिरक्षक म्हणून संजू सॅसमन व लोकेश राहुल यांच्याबाबत चर्चा केली गेली. संजू सॅमसन यानेही बाजी मारली.

भारताचा वर्ल्ड कप संघ –

रोहित शर्मा ( कर्णधार), हार्दिक पांड्या ( उप कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
राखीव खेळाडू – शुबमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलिल अहमद

टी-20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेले 20 संघ

अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा

टी-20 वर्ल्ड कपमध्ये कोणते संघ कोणत्या गटात

A – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
B – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
C – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
D – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड्स, नेपाळ


हेही वाचा – T-20 World Cup 2024: न्यूझीलंडचा संघ जाहीर; केन विल्यमसन कॅप्टन तर ‘या’ धाकड नावांचाही समावेश

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 30, 2024 3:55 PM
Exit mobile version