T20 world cup 2021 : नामिबियाच्या संघात व्यावसायिक खेळाडू; दिवसा क्रिकेट खेळतो अन् रात्री नोकरी करतो

T20 world cup 2021 : नामिबियाच्या संघात व्यावसायिक खेळाडू; दिवसा क्रिकेट खेळतो अन् रात्री नोकरी करतो

सध्या आयसीसी टी २० विश्वचषकाच्या स्पर्धेत नामिबियाचा संघ खेळत आहे. नामिबियाच्या संघात असा एक खेळाडू आहे जो दिवसा क्रिकेट खेळून रात्री आपला नोकरी व्यवसाय करतो. तो क्रिकेट खेळून नोकरीही करतो. क्रेग विल्यम्स असे या खेळाडूचे नाव आहे. नामिबियाच्या संघाचा रविवारी अफगाणिस्तानशी सामना होणार आहे. या सामन्यासाठी क्रेग विल्यम्सचा संघातील पहिल्या ११ खेळाडूंमध्ये समावेश आहे. विल्यम्सने पत्रकार परिषदेत देताना सांगितले की, “माझे मुख्य काम काहीतरी वेगळे आहे. मी एका विमा कंपनीत काम करतो दिवसा क्रिकेट खेळून रात्री विमा कंपनीचे काम करतो” विल्यम्सच्या या दुहेरी कामाची सर्वत्रच चर्चा रंगली आहे.

त्याने सांगितले, मला कोणीतरी चुकीचे सिध्द करावे असे मला वाटते, पण क्रिकेटमध्ये मी एकमेव खेळाडू आहे जो दिवसा क्रिकेट खेळून रात्री विमा कंपनीसाठी काम करतो. लक्षणीय बाब म्हणजे नामिबियाकडे १८ पूर्णवेळ खेळाडू नसताना देखील त्यांच्या संघाला विश्वचषकात जागा मिळाली. त्यांनी सुपर १२ मध्ये आपले स्थान मिळवून सुपर १२ फेरीतील स्कॉटलँडविरूध्दच्या सामन्यात स्कॉटलँडचा पराभव केला. आता नामिबियाच्या संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण त्यांना अफगाणिस्तान, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि भारतासारख्या संघाचा सामना करावा लागणार आहे.

जेव्हा क्रेग विल्यम्सने क्रिकेटला रामराम केले होते…..

विल्यम्सला त्याच्या नोकरीत अधिक लक्ष घालता यावे यासाठी त्याने २०१८ मध्ये क्रिकेटमधून राजीनामा दिला होता. पण प्रशिक्षक पियरे डी ब्रुइन यांनी त्याला पुन्हा क्रिकेटमध्ये आणले. तरीही त्याच्यासाठी क्रिकेट ही एक भेट आहे, तो क्रिकेट सेंटर, क्रिकेट शॉप आणि कनिष्ठ अकादमी चालवतो. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेल्या विल्यम्सने सांगितले, “मी व्यवसायासाठी खूप काही करतो. नामिबियाच्या क्रिकेट संघाकडून खेळणे ही माझ्यासाठी एक भेट आहे. मी याला माझा छंद नाही म्हणू शकत. कारण मी एक व्यावसायिक खेळाडू आहे. आणि मी त्याचा खूप आनंद घेतो. मी यावर १०० टक्के अवलंबून न राहता इतर गोष्टी देखील करतो ज्या मला माझ्या जीवनात व्यस्त ठेवतात.

First Published on: October 31, 2021 8:09 PM
Exit mobile version