T-20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेसह इंग्लंडचा संघ जाहीर

T-20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेसह इंग्लंडचा संघ जाहीर

मुंबई : येत्या 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्व (20) संघांचा समावेश आहे. नुकताच बीसीसीआयने टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली. भारतीय संघाचे कर्णधार पद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले असून उप-कर्णधार पदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आली आहे. भारतासह दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे. (T20 World Cup 2024 South Africa And England Announce Teams)

टी-20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंडने जोस बटलरकडे कर्णधार पद सोपवले आहे तर, दक्षिण आफ्रिकेने एडन मार्क्रम याला कर्णधार केले आहे. विशेष म्हणजे इंग्लंडच्या संघात दोन अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. अनेक महिने दुखापतीशी झुंज दिल्यानंतर इंग्लंडचा स्टार बॉलर जोफ्रा आर्चर याचे पुनरागमन झाले आहे. जोफ्राच्या संघातील पुनरागमनामुळे इंग्लंडची ताकद वाढली आहे. जोफ्राने अखेरचा सामना मे 2023 मध्ये खेळला होता. त्यानंतर तो दुखापतीमुळे बाहेर पडला. आता जवळपास वर्षभराने निर्णायक क्षणी त्याचे कमबॅक झाले आहे. जोफ्रा आर्चर याच्यासह ख्रिस जॉर्डन याचेही पुनरागमन झाले आहे.

हेही वाचा – T-20 World Cup 2024: न्यूझीलंडचा संघ जाहीर; केन विल्यमसन कॅप्टन तर ‘या’ धाकड नावांचाही समावेश

दरम्यान, 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडीजमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर झाला आहे. एनरिच नॉर्खिया आणि क्विंटन डी कॉकला संघात स्थान देण्यात आले आहे. नॉर्खिया आणि क्विंटन डी-कॉक यांना कराराच्या यादीतून वगळण्यात आले होते. मात्र, त्यांना संघात स्थान देण्यात आले आहे. नॉर्खिया दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून सप्टेंबर 2023 पासून दूर राहिला होता. दुसरीकडे क्विंटन डी कॉकनं एकदिवसीय क्रिकेटमधून 2023 मध्ये निवृत्ती घेतली होती. याशिवाय त्यानं कसोटी क्रिकेटमधून 2022 मध्ये निवृत्ती घेतली होती.

वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संघ :

जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, रीस टोपले आणि मार्क वुड.

दक्षिण आफ्रिकेचा संघ :

एडन मार्क्रम (कर्णधार), ओट्टनील बार्टमन, गेराल्ड कोतजिया, क्विंटन डी कॉक, बजोर्न फोर्ट्युई, रेझा हेन्ड्रिक्स, मार्को जनसेन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, एनरिक नॉर्खिया, कगिसो रबाडा, रेयान रिकेल्टन, तबरैज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स

राखीव खेळाडू : नांद्रे बर्गर, एल. एनगिडी


हेही वाचा – T-20 World Cup 2024 : कर्णधार रोहित शर्मा तर, हार्दिक पांड्या उपकर्णधार; टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 30, 2024 4:40 PM
Exit mobile version