साथियनचा मुख्य फेरीत प्रवेश

साथियनचा मुख्य फेरीत प्रवेश

भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू साथियन ज्ञानशेखरनने चीन येथे सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन (आयटीटीएफ) पुरुष विश्वचषकाच्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने या स्पर्धेच्या पहिल्या साखळी सामन्यात फ्रांसच्या सायमन ग्वाझीवर ४-३ अशी मात केली. ग्वाझीविरुद्धचा सामना जिंकण्याची साथियनची ही पहिलीच वेळ होती. ग्वाझीविरुद्धच्या सामन्याच्या सुरुवातीला साथियनला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे तो ०-२ असा मागे पडला होता. मात्र, त्याने दमदार पुनरागमन केले. त्यामुळे एक तास आणि चार मिनिटे चाललेला हा सामना साथियनने ४-३ असा जिंकला.

हा सामना जिंकल्यानंतर साथियन म्हणाला, मी किती खुश आहे हे शब्दांत सांगू शकत नाही. ग्वाझीविरुद्ध दोन सामने गमावल्यानंतर हा माझा पहिला विजय होता. जागतिक संघ अजिंक्यपद स्पर्धेत मी ग्वाझीविरुद्ध एका गुणाची आघाडी घेतली होती आणि त्यानंतरही सामना गमावला. मात्र, यावेळी मी कोणतीही चूक केली नाही.

त्यानंतरच्या दुसर्‍या साखळी सामन्यात साथियनने डेन्मार्कच्या जोनाथन ग्रोथचा ४-२ असा पराभव केला. साथियनने या सामन्याचे पहिले दोन सेट ११-३, १२-१० असे जिंकले, पण तिसरा सेट ७-११ असा गमावला. मात्र, पुन्हा चौथा सेट १६-१४ असा, तर सहावा सेट ११-८ असा जिंकत स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला.

First Published on: November 30, 2019 4:05 AM
Exit mobile version