Tokyo Olympics : तिरंदाज दीपिका कुमारीच्या पदकाच्या आशा कायम!

Tokyo Olympics : तिरंदाज दीपिका कुमारीच्या पदकाच्या आशा कायम!

दीपिका कुमारीला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यात पुन्हा अपयश

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारी भारताची तिरंदाज दीपिका कुमारीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा कायम राखली आहे. दीपिकाला प्रविण जाधवच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरीत चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. परंतु, महिला एकेरीतील पहिले दोन्ही सामने जिंकत दीपिकाने तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तिरंदाजीत दीपिका आणि तिचा अतानू दास यांच्यावर आता भारताची मदार आहे. दीपिकाला यंदा सुवर्णपदकाची प्रबळ दावेदार मानले जात असून महिला एकेरीच्या पहिल्या दिवशी तिने चांगला खेळ केला.

दुसऱ्या फेरीत मुसिनो-फर्नांडेझवर मात 

दीपिकाने पहिल्या फेरीच्या सामन्यात भूतानच्या कर्माचा ६-० असा पराभव केला. तिरंदाजीत एक सेट जिंकल्यावर दोन गुण मिळत असून दीपिकाने सरळ सेटमध्ये कर्मावर मात केली. दीपिकाने या फेरीतील सेट अनुक्रमे २६-२३, २६-२३ आणि २७-२४ असे जिंकले. दुसऱ्या फेरीत दीपिकाने पाच सेट रंगलेल्या सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर मुसिनो-फर्नांडेझचा ६-४ असा पराभव केला. चार सेटनंतर दोन्ही खेळाडूंमध्ये बरोबरी होती. परंतु, पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये दीपिकाने सलग दोन नऊ व एकदा आठ गुणांवर बाण मारला. जेनिफरला बरोबरी करण्यासाठी १० गुणांची आवश्यकता होती. मात्र, तिला नऊ गुणच मिळवता आल्याने दीपिकाने सामने जिंकत तिसरी फेरी गाठली.

First Published on: July 28, 2021 9:06 PM
Exit mobile version