Tokyo Olympics : १०० वर्षांचा दुष्काळ संपला; भालाफेकपटू नीरज चोप्राला ‘सुवर्ण’

Tokyo Olympics : १०० वर्षांचा दुष्काळ संपला; भालाफेकपटू नीरज चोप्राला ‘सुवर्ण’

भारतासाठी आणि भारतीय खेळांसाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. भारताने टोकियो ऑलिम्पिकचा ‘सुवर्ण’ शेवट केला. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. भारताचे हे ऑलिम्पिक स्पर्धांतील केवळ दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले. याआधी नेमबाज अभिनव बिंद्राने (२००८) भारताला ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक जिंकवून दिले होते. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरच्या अंतराची नोंद केली. हे अंतर इतर कोणत्याही भालाफेकपटूला पार करता आले नाही. त्यामुळे नीरजने ऐतिहासिक ‘सुवर्ण’ कामगिरी केली. भारताचे हे ऑलिम्पिक अ‍ॅथलेटिक्समधील १०० वर्षांतील पहिलेच पदक ठरले. तसेच यंदाच्या ऑलिम्पिकमधील हे भारताचे एकूण सातवे पदक ठरले. त्यामुळे भारताने २०१२ सालच्या लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकांच्या सर्वोत्तम कामगिरीला मागे टाकले आहे.

 

First Published on: August 7, 2021 5:40 PM
Exit mobile version