UEFA Champions League : किलियन एम्बापेचे गोल, पॅरिसचा विजय 

UEFA Champions League : किलियन एम्बापेचे गोल, पॅरिसचा विजय 

किलियन एम्बापे

स्टार खेळाडू किलियन एम्बापेने केलेल्या दोन गोलच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मान संघाने युएफा चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात बायर्न म्युनिकचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लेगचा सामना पॅरिसने ३-२ असा जिंकला. मागील वर्षी याच दोन संघांमध्ये चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना झाला होता, ज्यात बायर्नने विजय मिळवला होता. त्यामुळे आता दुसरा लेग जिंकत त्या पराभवाची परतफेड करण्याची पॅरिसला चांगली संधी आहे. तसेच हा गतविजेत्या बायर्नचा १९ चॅम्पियन्स लीग सामन्यांत पहिलाच पराभव ठरला. दुसरीकडे चेल्सीने उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या लेगमध्ये पोर्तुगीज संघ एफसी पोर्टोला २-० असे पराभूत केले. चेल्सीकडून मेसन माऊंट आणि बेन चिलवेल यांनी गोल केले.

बायर्नला लेव्हनडोस्कीची उणीव भासली

बायर्न आणि पॅरिस यांच्यातील सामना सुरुवातीपासूनच चुरशीचा झाला. बायर्नचा स्टार स्ट्रायकर रॉबर्ट लेव्हनडोस्की या सामन्यात खेळला नाही आणि त्याची उणीव बायर्नला भासली. याऊलट तिसऱ्या मिनिटाला एम्बापेने, तर २८ व्या मिनिटाला कर्णधार मार्क्विनियोसने केलेल्या गोलमुळे पॅरिसला २-० अशी आघाडी मिळाली. मात्र, ३७ व्या मिनिटाला चोपो-मोटिंग आणि ६० व्या मिनिटाला थॉमस मुलरने गोल करत बायर्नला २-२ अशी बरोबरी करून दिली. परंतु, एम्बापेने पुन्हा एक गोल करत पॅरिसला हा सामना ३-२ असा जिंकवून दिला.

First Published on: April 8, 2021 9:33 PM
Exit mobile version