अमेरिकन ओपन: ‘बिग फोर’चा थरार आजपासून

अमेरिकन ओपन: ‘बिग फोर’चा थरार आजपासून

फोटो सौजन्य- YouTube

दरवर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा अशी ओळख असणाऱ्या ‘अमेरिकन ओपन’ची चुरस, आजपासून अर्थात सोमवापासून सुरु होणार आहे. दरम्यान या स्पर्धेमध्ये खेळाडू रॉजर फेडरर, रफाल नदाल, नोव्होेक जोकोविच आणि अँडी मरे हे चार चुरशीचे खेळाडू सहभागी होणार असल्याने आजपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेची उत्सुकता अधिक वाढली आहे. या चारही ताकदीच्या खेळांडूना ‘बिग फोर’ म्हणून ओळखले जाते. बिग फोर अशी ख्याती असलेले हे चारही टेनिस प्लेअर ‘अमेरिकन ओपन’ स्पर्धांचे माजी विजेते आहेत. आता वर्षभरानंतर हे चारही दिग्गज खेळाडू एकत्र खेळणार असल्यामुळे टेनिस प्रेमींचे लक्ष ‘अमेरिकन ओपन्स’कडे लागले आहे. दरम्यान हे चारही खेळाडू ताकदीचे असल्यामुळे नेमकं कोण बाजी मारणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पुरुष एकेरी स्पर्धेसाठी नदाललचे नाव अग्रस्थानी असले तरी जोकोविचकडेही विजेतेपदाचा दमदार प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जात आहे. जोकोविच हा यंदाच्या विंबल्डन स्पर्धेचा विजेता असल्याने त्याच्याकडून सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या असणार हे नक्की. दरम्यान जोकोविचचा सलामीचा सामना हंगेरीच्या मार्टिन फक्सोविक्सची होणार असून, नदालचा सलामी सामना स्पेनच्या डेव्हिड फेररशी रंगणार आहे.

सेरेना विल्यम्सही मैदानात

पुरुष खेळांडूसोबतच अमेरिकन ओपन स्पर्धेमध्ये महिला खेळाडूंचीही चुरस पाहायला मिळणार आहे. एकूण २३ ग्रॅंड स्लॅम विजेतीपदं मिळवलेल्या सेरेना विल्यम्सला, यावर्षीच्या अमेरिकन ओपनमध्ये सतरावे मानांकन आहे. विशेष म्हणेज आई झाल्यानंतर सेरेना पहिल्यांदाच अमेरिकन ओपन स्पर्धांमध्ये खेळणार आहे. मॅग्डा लिटेन हिच्याशी सेरेनाचा सलामी सामना रंगणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदांच्या विक्रमाशी सेरेनाला बरोबरी करायची झाल्यास, तिला केवळ एका विजेतेपदाची आवश्यकता आहे.

First Published on: August 27, 2018 8:41 AM
Exit mobile version