कॅनडाची बियान्का अँड्रेस्कू विजेती

कॅनडाची बियान्का अँड्रेस्कू विजेती

बहुचर्चित यूएस ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 15 व्या मानांकित कॅनडाच्या बियान्का अँड्रेस्कूने अमेरिकेच्या 23 ग्रँड स्लॅम विजेती सेरेना विल्यम्सचा पराभव करत इतिहास रचला आहे. महिला एकेरीच्या फायनलमध्ये 19 वर्षीय बियान्काने सेरेनाचा सरळ सेटमध्ये 6-3, 7-5 ने पराभव केला. यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी बियन्का कॅनडामधील पहिली महिला खेळाडू आहे. सामन्याच्या सुरूवातीपासूनच बिएन्काने सेरेनावर वर्चस्व राखले होते. या पराभवासह सेरेनाचा ऑस्ट्रेलियाची महान टेनिसपटू मार्गारेट कोर्टच्या 24 ग्रँड स्लॅम जेतेपदाची बरोबरी करण्याची संधी गमावली.बियान्कापूर्वी कॅनडाच्या युजेनी बुशार्डने 2014 मध्ये ग्रँड स्लॅम फायनलमध्येही प्रवेश मिळवला होता. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्यूड्रो यांनी बियान्का अँड्रेसकू चे ट्विटरवरून अभिनंदन केले.

यूएस ओपन जिंकणारी बियान्का दुसरी युवा खेळाडू ठरली आहे. तिच्याआधी रशियाच्या मारिया शारापोवाने 2006 मध्ये यूएस ओपन जिंकण्याचा पराक्रम केला होता. रशियाच्या शारापोव्हाने वयाच्या 17 व्या वर्षी 2004 मध्ये विम्बल्डनचे जेतेपद जिंकले होते.

सेरेनाचा बॅडपॅच

23 ग्रँड स्लॅम जिंकणार्‍या सेरेनाचा फायनलमधील हा सलग चौथा पराभव आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिला विम्बल्डनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. 2018 मध्ये सेरेना अँजेलिक केर्बर आणि 2019 जुलैमध्ये सिमोना हलेप यांच्याकडून पराभूत झाली. पाचव्या क्रमांकाच्या युक्रेनच्या एलेना स्वितोलिनाला सेमीफायनलमध्ये सरळ सेटमध्ये 6-3, 6-1 ने पराभूत करून सेरेनाने दहाव्यांदा यूएस ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.

First Published on: September 9, 2019 1:27 AM
Exit mobile version