ही पुणेकर मुलगी ठरली आशियातील वेगवान सायकलपटू

ही पुणेकर मुलगी ठरली आशियातील वेगवान सायकलपटू

सायकलपटू वेदांगी कुलकर्णी

पुण्याची २० वर्षीय सायकलपटू वेदांगी कुलकर्णीने इतिहास रचला आहे. वेदांगीने विविध देशांमधून सायकलींग करून नवीन रेकॉर्ड बनवला आहे. कमी दिवसांमध्ये जास्त अंतर कापून वेदांगी जलद अशिया सायकलपटू बनली आहे. वेदांगीने पुण्याहून सुरुवात करत कोलकाता पर्यंत तब्बल २९ हजार किलोमीटर सायकल चालवली. पहाटे लवकर सायकल चालवून तीने हा प्रवास केला आहे. तिने आपल्या सायकल प्रवासाची सुरुवात जुलै महिन्यात ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरातून केली होती. यापूर्वी ब्रिटनची जेनी ग्राहम (३८) हिने सायकलने जग भ्रमण करण्याचा रेकॉर्ड बनवला होता. १२४ दिवसांमध्ये तीने सायकलने जग भ्रमण केले होते. असा विक्रम करणारी वेदांगी ही सर्वात कमी वयाची सायकलपटू ठरली आहे.


वेदांगीने सांगितले आपले अनूभव 

प्रत्येक ठिकाणी चांगले आणि वाईट अनूभव मला आले. १५९ दिवसांमध्ये १४ देशात मी फिरली. दररोज ३०० किमी सायकल मी चालवली अशी प्रतिक्रिया वेदांगीने दिली आहे. कमी वेळेत जगाचे भ्रमण करणारी सर्वात जलद सायलपटू ठरल्यामुळे माझ्या मुलीवर मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया वेदांगीचे वडील विवेक कुलकर्णी यांनी दिली आहे.

First Published on: December 24, 2018 8:55 AM
Exit mobile version