विजय शंकरला लॉटरी, ऋषभ पंतला डच्चू

विजय शंकरला लॉटरी, ऋषभ पंतला डच्चू

विजय शंकर

इंगलंडमध्ये ३० मे पासून विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. क्रिकेट चाहत्यांच्या मनात या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतातून कोण कोणते खेळाडू खेळणार आहेत ही माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुकता लागली होती. याशिवाय भारतीय संघात मधल्या फळीमध्ये विजय शंकर, ऋषभ पंत आणि अंबाती रायडू यांच्यापैकी एकाची निवड होणार होती. यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. अखेर बीसीसीआयच्या निर्णय समितीची यासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली हजर होते. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर अंबाती रायडू आणि ऋषभ पंतला संघातून डच्चू देण्यात आला आहे. तर विजय शंकरला विश्वचषकासाठी संधी देण्यात आली आहे.

विजय शंकरची कारकिर्द

विजय शंकर हा ऑल राऊंडर आहे. सध्या तो आयपीएलच्या हैद्राबाद संघाकडून खेळत आहे. आयपीएलमध्ये त्याची कामगिरीदेखील चांगली आहे. विजयने तमिळनाडूच्या संघात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्याने २०१२ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटपटूची म्हणून पदार्पण केले. प्रथम श्रेणीच्या स्तरावर त्याने आपला अधिकार सिद्ध करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी घेतला. त्यानंतर २०१४-१५ रणजी हंगामात विजय दोन मॅन ऑफ द मॅच पुरस्कारांसह निवड समितीत आला. त्यावर्षी झालेल्या नॉकआउट्समध्ये त्याने १११, ८२, ९१ आणि १०३ गुण मिळवले. त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे विजयला भारतीय ‘ए’ संघात स्थान दिले गेले. श्रीलंका आणि बांग्लादेशच्या निधस ट्रॉफीमध्ये त्याने उत्कृष्ठ कामगिरी केली. त्याच्या निधस ट्रॉफीमधील कामगिरीमुळे त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळाले. लीग स्टेजमध्ये त्याला गोलंदाजीसाठी मॅन ऑफ द मॅन पुरस्कार देण्यात आला. आयपीएलमध्येही त्याने उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. याअगोदर तो चेन्नई आणि हैद्राबादच्या संघाकडून खेळला आहे. यावर्षी तो हैद्राबादकडून खेळत आहे. दमदार आणि उत्कृष्ठ कामगिरीमुळे विजयची निवड आगामी विश्वचषकासाठी करण्यात आली आहे.

First Published on: April 15, 2019 4:14 PM
Exit mobile version