भारतीय संघातले नव्या दमाचे खेळाडू, विराटचे संघात बदलाचे संकेत

भारतीय संघातले नव्या दमाचे खेळाडू, विराटचे संघात बदलाचे संकेत

न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात भारतीयसंगाचा पराभव झाल्यानंतर विराटने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने जलद गोलंदाजांचे वाढते वय लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. यानुसार भारतीय संघात आता नव्या पिढीतील खेळाडूंना संधी देणार असल्याचे दिसत आहे. न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत फलंदाजाकडून योग्य साथ मिळाली नाही आणि पराभव झाला, त्यामुळे विराट हा निर्णय घेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

गोलंदाजांना योग्य कामगिरी बजावता आली नाही

न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्याच्या पराभवानंतर, भारतीय फलंदाजाची या स्पर्धेची कामगिरी अतिशय निराशजनक होती. सध्या भारतीय क्रिकेट संघात जसप्रीत बमुराह, इशांत शर्मा, मोहम्म्द शमी आणि उमेश यादव यांसारखे गोलंदाज आपली कामगिरी बजावत आहेत. मात्र न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नाही. ‘न्यूझीलंडच्या सामन्यात ज्या प्रमाणे प्रसंगाला तोंड द्यावे लागले त्याच प्रमाणे असा प्रसंग पुन्हा येऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील. त्यामुळे आता संघाला पुढे घेऊ जाणारे असे गोलंदाज लवकर शोधले पाहीजे त्यांना संधी दिली पाहीजे’, असे विराट म्हणाला आहे.

‘भविष्याचा विचार करून आपल्याला ३-४ खेळाडूंची निवड करणे गरजेचे आहे’, असे विराटने म्हटले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या संघावर बाजी मारणारा इशांत शर्मा दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकला नव्हता. अशा प्रकारे भविष्यात अचानक संघातून बाहेर झाल्यास संघाला कोणीतरी पर्याय हवा त्यामुळे हा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता आहे.

विराटला आणखी सराव करायला हवा

न्यूझीलंडविरूद्धच्या पराभवानंतर विराटच अपयशच याला कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र यानंतर आता ‘विराटला अजून सराव करण्याची गरज आहे’, असा सल्ला कपिल देव यांनी दिला आहे. विराटने दोन्ही कसोटी सामन्यातील चारही डावांत २० पेक्षा जास्त धावसंख्या ओलांडली नाही. यावरून भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी विराटच्या या खराब कामगिरीवर आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘ज्यावेळी तुम्ही वयाची तिशी ओलांडता त्यावेळी साहजिकपणे तुमच्या दृष्टीवर परिणाम व्हायला लागतो. काही वर्षांपूर्वी स्विंग चेंडू विराट सहज चौकारासाठी तटवायचा. मात्र या दौऱ्यात दोनवेळा बाद झालाय, माझ्यामते त्याने यावर काम करुन अधिक सराव करण्याची गरज आहे’, असे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले आहे.

First Published on: March 3, 2020 9:04 PM
Exit mobile version