IPL 2023 : आयपीएलमध्ये कोहलीची ‘विराट’ कामगिरी, रोहितचा विक्रम मोडला

IPL 2023 : आयपीएलमध्ये कोहलीची ‘विराट’ कामगिरी, रोहितचा विक्रम मोडला

विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारखे दिग्गज भारतीय क्रिकेटपटू आयपीएल अर्ध्यावरच सोडू शकतात.

आयपीएल २०२३च्या १६व्या हंगामाला मागील दोन दिवसांपासून सुरूवात झाली आहे. आतापर्यंत आयपीएलचे पाच ते सहा सामने पूर्ण झाले आहेत. यावेळी पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर आठ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने अर्धशतक ठोकत ८२ धावांची नाबाद खेळी केली. बंगळुरूच्या घरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळताना कोहलीचा धमाका पाहायला मिळाला.

यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा मोठा विक्रम मोडला आहे. विराटने मुंबईविरुद्धच्या सामन्यात ८२ धावांची झंझावती खेळी केली. तर विराट कोहलीने १५० प्लसच्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केले. अशाप्रकारे कोहलीने २३व्या वेळा अर्धशकत ठोकलं आहे.

विराट कोहलीने आपल्या तुफान फटकेबाजीसह १५० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटने २३ अर्धशतकं झळकावली आहेत. आतापर्यंत हा विक्रम भारतासाठी रोहित शर्माच्या नावावर होता. रोहितने २२वेळा १५० प्लसच्या स्ट्राईक रेटने अर्शशतकं झळकावली आहेत. या यादीत महेंद्रसिंग धोनीचं तिसरं नाव आहे. त्याने १९ वेळा हा पराक्रम केला आहे. तर सुरेश रैनानेही १९ वेळा अर्धशतकं ठोकली आहेत.

मुंबई इंडियन्सविरुद्ध कोहलीने ४९ चेंडूत ६ चौकार आणि ५ षट्कारांच्या मदतीने ८२ धावांची नाबाद खेळी केली. यावेळी विराटचा स्ट्राईक रेट १६७ पेक्षा जास्त होता. तसेच बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर आठ विकेट्सने सामना जिंकला. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी खेळीच्या जोरावर आरसीबीने मुंबईचा ८ विकेट्सने पराभव केला. तर सलामीसाठी उतरलेल्या कोहली आणि डु प्लेसिसने १४८ धावांची मोठी भागीदारी केली.


हेही वाचा : कृपया आता निवृत्ती घे.., भारतीय संघ व ‘मुंबई’ला सोड; पराभवानंतर रोहित शर्मा ट्रोल


 

First Published on: April 3, 2023 4:18 PM
Exit mobile version