इंग्लंडमध्ये ‘विराट शतक’

इंग्लंडमध्ये ‘विराट शतक’

विराट कोहली

इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेतील पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने झुंजार खेळी करत शतक ठोकले आहे. भारतीय संघाची पडझड होत असताना विराटने एक बाजू लावून धरत झुंझार खेळी केली. विराटचे हे कसोटी कारकीर्दीतील २२ वे आणि इंग्लंडमधील पहिलेच शतक असून त्याच्या खेळीने भारतीयांची मान उंचावली आहे. या खेळीने विराट इंग्लंडच्या भूमिवर नेहमीच अपयशी ठरत आला आहे. हा शिक्का देखील आता पुसला गेला आहे. इंग्लंडमध्ये केलीली विराटची ही खेळी आत्तापर्यंतची सर्वोत्कृष्ट खेळी आहे.

२२५ चेंडूत १४९ धावा

विराटचे शतक झाल्यानंतर विराटने तळाच्या फलंदाजांच्या साथीने धावगती वाढवली आणि २२५ चेंडूत १४९ धावांची खेळी केली. मात्र अवघ्या एका धावाने विराटचे दीडशतक हुकले. भारताचा पहिला डाव २७४ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद २८७ धावा करत मोठ्या आघाडीची स्वप्न पाहणाऱ्या इंग्लंडला केवळ १३ धावांची आघाडी मिळाली आहे.

विराटची सर्वोत्कृष्ट खेळी

इंग्लंडच्या दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहली किती धावा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात शंभराव्या चेंडूवर कोहलीने चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडमधील कसोटी सामन्यांतील कोहलीची सर्वाधिक खेळी ठरली आहे.

दिवसअखेर इंग्लंड १ बाद ९ धावा

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यात इंग्लंडच्या २८७ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव सर्वबाद २७४ धावात आटोपला. भारतातकडून सर्वाधिक विराटने १४९ धावांची खेळी केली. यानंतर इंग्लंडने पुन्हा खेळताना  डावात १ बाद ९ धावा केल्या आहेत.

 

First Published on: August 3, 2018 8:14 AM
Exit mobile version