T20 Rankings : विराट कोहलीला एका स्थानाची बढती, राहुल तिसऱ्या स्थानी

T20 Rankings : विराट कोहलीला एका स्थानाची बढती, राहुल तिसऱ्या स्थानी

विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहलीला जागतिक टी-२० क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत एका स्थानाची बढती मिळाली असून तो आठव्या स्थानावर पोहोचला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीनुसार, भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने अव्वल तीन फलंदाजांमध्ये एंट्री केली. राहुल ८१६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून त्याच्यात आणि दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या बाबर आझममध्ये ५५ गुणांसह फरक आहे. इंग्लंडचा डावखुरा फलंदाज डाविड मलान ९१५ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे.

First Published on: December 9, 2020 9:41 PM
Exit mobile version