विराट कोहली की मनी हाइस्टमधील प्रोफेसर? भारतीय कर्णधाराच्या नव्या लूकची चर्चा

विराट कोहली की मनी हाइस्टमधील प्रोफेसर? भारतीय कर्णधाराच्या नव्या लूकची चर्चा

विराट कोहली की मनी हाइस्टमधील प्रोफेसर? भारतीय कर्णधाराच्या नव्या लूकची चर्चा 

‘मनी हाइस्ट’ या नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय वेब सीरीजबाबत सध्या बरीच चर्चा होत आहे. मनी हाइस्टच्या पाचव्या सिझनची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या वेब सिरीजमधील मास्टरमाइंड ‘द प्रोफेसर’ची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेज आहे. तसेच त्याचा लूक हा चाहत्यांना विशेष पसंतीस पडतो. आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा लांब केस, मोठी दाढी आणि चष्मा लावलेला नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या या लूकची बरीच चर्चा होत असून अनेकांनी विराटची तुलना मनी हाइस्टमधील प्रोफेसरशी केली आहे.

First Published on: May 26, 2021 5:21 PM
Exit mobile version