ऑस्ट्रेलियामध्ये गजर धोनी नामाचा! पाहा व्हिडिओ

ऑस्ट्रेलियामध्ये गजर धोनी नामाचा! पाहा व्हिडिओ

महेंद्रसिंग धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू महेंद्रसिंग धोनी हा सर्वाचाच आवडता खेळाडू आहे. संघर्षातून पुढे आलेल्या या खेळाडूसाठी अनेक लोक जीव ओवाळायला देखील तयार असतील. तो कर्णधार पदी असताना त्याची कामगरी वाखणण्याजोगी आहे. महेंद्रसिंग धोनीची वागणूक नम्र आहे, त्यामुळे अनेक तरुण त्याचे अनुकरण करतात. त्याच्या कामगिरीतून प्रेरणा घेतात. या अवलिया खेळाडूच्या कामगिरीवर फक्त देशातील लोकांचाच नव्हे, तर विदेशातील नागरिकांचे देखील तितकेच प्रेम आहे. यासंबंधी एक व्हिडिओ धोनीने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ऑस्ट्रेलियाचे नागरिक ‘धोनी…धोनी’ असा गजर करताना दिसत आहेत.

हेही वाचा – धोनीला भेटायला आजीबाई पोहचल्या मैदानात

काय आहे नेमकं व्हिडिओमध्ये?

महेंद्रसिंग धोनीने ट्विटरवर शेअर केलेला व्हिडिओ हा तिसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या दिवसाचा आहे. या दिवशी मैदानावर जेव्हा धोनी उतरतो, तेव्हा ऑस्ट्रेलियाचे नागरिक धोनी नामाचा प्रचंड गजर करतात. त्यांचा गजर या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दरम्यान, धोनीने या एकदिवसीय सामन्यात नाबाद ८७ धावांची खेळी केली होती. धोनीने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात तीनपैकी दोन सामन्यात अर्धशतक केले आहेत.

First Published on: January 20, 2019 3:09 PM
Exit mobile version