धोनीवर टीका करणाऱ्या आपल्या वडीलांचा युवराजकडून खुलासा

धोनीवर टीका करणाऱ्या आपल्या वडीलांचा युवराजकडून खुलासा

Yuvraj singh : युवराज सिंहच्या घरी चिमुकल्याचे आगमन

भारताचा तडाखेबाज खेळाडू युवराज सिंहने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. युवराजने सोमवारी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी युवराजने त्याचे वडील योगराज सिंह यांच्याबद्दल सांगितले. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९९३ मध्ये विश्वचषक जिंकल्यापासून त्यांनी कधिच युवराजला क्रिकेटशिवाय दुसरा खेळ खेळायला परवानगी दिली नाही. युवराजने भारतीय संघासाठी मोठं योगदान द्यावे, असे त्यांना नेहमी वाटत होते. काही कारणांमुळे युवराज संघाबाहेर होता, याला धोनीच जबाबदार आहे. असे युवराजचे वडील योगराज सिंह अनेकदा म्हणाले होते.

पत्रकार परिषदेत युवराज म्हणाला की,’माझे वडील माझ्यासाठी ड्र्रॅगनसारखे होते. त्यांचा सामना करणे अतिशय कठिण होतं. लहानपणी ते मला इतर कोणताही खेळ खेळायला देतं नसे. पण याचा मला फायदाच झाला आहे. त्यांनी मला खेळताना पाहून आपलं स्वप्न पूर्ण केलं. परंतु मला संघाबाहेर असल्याचे पाहून दुखी होते. याला भारताचा माजी कर्णधार धोनीच जबाबदार आहे.’ योगराज सिंह यांनी एमएस धोनीवरही वारंवार टीका केली. यामुळे योगराज सिंह हे अनेकवेळा वादात राहीले होते. योगराज सिह यांनी धोनीची तुलना रावणाशी केली होती. तसेच धोनीमुळेच युवराज टीमबाहेर गेला. धोनी युवराजला पसंत करायचा नाही, असे आरोप त्यांनी केले होते. योगराज सिंह यांनी भारतासाठी १ टेस्ट आणि ६ वनडे खेळल्या आहेत.

First Published on: June 12, 2019 12:31 PM
Exit mobile version