Womens World Cup 2022: वेस्ट इंडिजचा पराभव; सलग नवव्यांच्या ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत धडक

Womens World Cup 2022: वेस्ट इंडिजचा पराभव; सलग नवव्यांच्या ऑस्ट्रेलियाची अंतिम फेरीत धडक

वेस्ट इंडिचा परभाव करत ऑस्ट्रेलियाचा संघानं महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियानं १५७ धावांनी वेस्ट इंडिजचा पराभव केला आहे. महिला विश्वचषक स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग आठवा विजय आहे. शिवाय महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीच नवव्यांदा प्रवेश केला आहे. या विश्वचषकाच्या साखळी टप्प्यातील सातही सामने ऑस्ट्रेलियानं जिंकले होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्ट इंडिचा याच्यात झालेल्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पावसानं लावलेल्या हजेरीमुळं हा सामना ४५-४५ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियानं ४५ षटकांत ३ गडी गमावून ३०५ धावांची मोठी धावसंख्या उभारली.

ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार अॅलिसा हिलीने १०७ चेंडूत सर्वाधिक १२९ धावांची खेळी खेळली. त्याच्याशिवाय रॅचेल हेन्सनेही १०० चेंडूत ८५ धावा केल्या. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २१६ धावांची भागीदारी झाली. शेवटच्या षटकात बेथ मुनीने ३१ चेंडूत ४३ धावा करत ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या ३०० च्या पुढे नेली. व वेस्ट इंडिजसमोर ३०६ धावांचं लक्ष्य उभं केलं.

या ३०६ धावाच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ ३७ षटकांत १४८ धावांत गारद झाला. कर्णधार स्टेफनी टेलर (४८) वगळता एकही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. संघाच्या ६ फलंदाजांना दुहेरी आकडाही पार करता आला नाही. संघाची धावसंख्या १२ असताना वेस्ट इंडिजला पहिला धक्का बसला. रशादा विल्यम्स खाते न उघडताच माघारी परतली. गोलंदाज मेगनने तिला बाद केले. यानंतर डायंड्रा डॉटिनही ३५ चेंडूत ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली.

वेस्ट इंडिजला तिसरा धक्का हेली मॅथ्यूजच्या रूपाने बसला. ही ३४ धावा करून जोनासेनची शिकार झाली. या तीन धक्क्यांमधून वेस्ट इंडिजचा डाव सावरता आला नाही आणि प्रत्येकी एक विकेट पडली आणि संपूर्ण संघ १४८ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाच्या पाच गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला तर जेस जोनासेनने दोन गडी बाद केले.

मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा विजयाचा विक्रम अतुलनीय आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने ७४ पैकी ६५ एकदिवसीय सामने जिंकले आहेत. तसंच, केवळ ८ सामने गमावले आणि एक बरोबरीत राहिला.


हेही वाचा – ICC ODI Ranking: आयसीसी ODI क्रमवारीत बांगलादेश पाकिस्तानच्या एक पाऊल पुढे

First Published on: March 30, 2022 2:41 PM
Exit mobile version