Asian Games 2018 : मी पदक नक्की जिंकेण – साक्षी मलिक

Asian Games 2018 : मी पदक नक्की जिंकेण – साक्षी मलिक

साक्षी मलिक

भारताची कुस्तीपटू साक्षी मलिकने आपण ऑलिम्पिक स्पर्धेत पदक नक्की जिंकू आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असा विश्वास दर्शविला आहे. पदक न जिंकता परत आल्यास चाहत्यांचा सामना करणे अवघड जात असल्याचे देखील साक्षीने सांगितले आहे. साक्षी ही भारताच्या महिला गटातील आघाडीची कुस्तीपटू असून तिने आतापर्यंत भारताकडून उत्तम कामगिरी केली आहे.

साक्षीचा फॉर्म भारतीयांसाठी चिंतेचा विषय

एप्रिलमध्ये झालेल्या गोल्डकोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये साक्षीला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले होते. त्यातच मागील काही काळापासून साक्षी तितक्या चांगल्या फॉर्ममध्ये देखील दिसून येत नाहीये. तसेच साक्षीला इस्तंबुलमध्ये झालेल्या स्पर्धेत पदक पटकावता आले नाही. त्यानंतर आगामी आशियाई गेम्समध्ये निवडी होण्यासाठी साक्षीला सूट देण्यात आली असल्याने आता ती स्पर्धेत कशी कामगिरी करते? याची चिंता सर्वच भारतीयांना लागली आहे.

साक्षी मलिक

काय आहे साक्षीचे म्हणणे

साक्षी भारतात लखनऊ येथे सराव करत असून तिने सरावानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “रिओ ऑलिम्पिकनंतर मी काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र तरी मला काही जागी विजय मिळवता आला नाही. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करते. पण शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक तंदुरुस्तीवरही लक्ष देणे महत्त्वाचे आहे आणि मी सध्या तेच करत आहे. त्यासोबतच स्पर्धेतून पदकाविना परतल्यास चाहत्यांचा सामना करणे कठीण असते.” असेही साक्षीने सांगितले.

वाचा – Asian Games 2018: नीरज चोप्रा फडकावणार भारताचा झेंडा

१८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशियाई खेळांसाठी साक्षी मलिक भारताचे प्रतिनिधीत्व करणार असून आशियाई खेळ हे इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबंग येथे १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान चालणार आहेत. या स्पर्धेत भारताकडून ५२४ खेळाडूंचे पथक रवाना झाले असून यात साक्षी मलिक ही सामील आहे. त्यामुळे साक्षी आता स्पर्धेत कशी कामगिरी करणार हे पाहणे औत्सुक्याचे राहील.

First Published on: August 10, 2018 6:14 PM
Exit mobile version