WTC Final : पहिल्या सत्रात खेळ होणार नसल्याचे कळल्यानंतर ट्विटरवर मिम्सचा ‘पाऊस’!

WTC Final : पहिल्या सत्रात खेळ होणार नसल्याचे कळल्यानंतर ट्विटरवर मिम्सचा ‘पाऊस’!

पहिल्या सत्रात खेळ होणार नसल्याचे कळल्यानंतर ट्विटरवर मिम्सचा 'पाऊस'

ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात खेळ होऊ शकला नाही. पहिल्यावहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आजपासून साऊथहॅम्पटन येथे खेळला जात आहे. हा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. साऊथहॅम्पटन येथे मागील काही दिवस उष्ण वातावरण होते. कडक ऊन असल्याने भारताने या सामन्यात दोन फिरकीपटू खेळवावे असे मत भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले होते. परंतु, इंग्लंडमधील वातावरण हे सतत बदलत असते. त्यामुळे मागील काही दिवस कडक ऊन असले, तरी आज आणि पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऐतिहासिक सामन्याची सुरुवातच पावसाने

आयसीसीने पावसाचा विचार करून अंतिम सामन्यासाठी सहावा दिवस राखीव ठेवला आहे. हा सामना १८ ते २२ जून या कालावधीत होणार असून २३ जून हा राखीव दिवस आहे. या ऐतिहासिक सामन्याची सुरुवातच पावसाने झाली आहे. पंचांनी पहिल्या सत्रात खेळ होणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे चाहत्यांची हिरमोड झाली. मात्र, पहिल्या सत्रात खेळ होणार नसल्याचे बीसीसीआय आणि आयसीसीने ट्विटरवरून जाहीर केल्यानंतर चाहत्यांनी मिम्सचा पाऊस पाडला.

First Published on: June 18, 2021 3:53 PM
Exit mobile version