Ranji Trophy: १९ वर्षांच्या फलंदाजाची बॅट तळपली, ६ डावांत ठोकली ३ शतकं

Ranji Trophy: १९ वर्षांच्या फलंदाजाची बॅट तळपली, ६ डावांत ठोकली ३ शतकं

रणजी ट्रॉफीमध्ये १९ वर्षाच्या फलंदाजाने अतुलनीय कामगिरी केली आहे. भारताला पाचव्यांदा अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधार यश धूलने रणजी ट्रॉफीमध्ये तिसरे शतक ठोकले आहे . दिल्ली क्रिकेटसाठी डावाची सुरुवात करताना यशने तिसऱ्या रणजी सामन्यात हा पराक्रम केला आहे. छत्तीसगडविरुद्धच्या तिसऱ्या शतकासाठी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली.

यापूर्वीही त्याने आपल्या पहिल्या रणजी सामन्यातच दोन शतक ठोकले होते. तामिळनाडूविरुद्धच्या रणजी ट्रॉफी पदार्पणात त्याने दोन्ही डावांत शतके झळकावली होती. म्हणजेच बॅक टू बॅक शतकांचा पाढा आणि रेकॉर्ड तोडण्यास सुरूवात केली. रणजीमध्ये पदार्पण केल्यानंतर दोन्ही डावात शतक झळकावणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे. त्यााच्या आधी १९५२-५३ मध्ये नारी कॉन्ट्रॅक्टर आणि २०१२-१३ मध्ये विराग आवटे यांनी हा चमत्कार केला होता. यानंतर यश धुलने झारखंडविरुद्ध दुसरा रणजी सामना खेळला. पण त्याची बॅट तिकडे तळपली नाही.

यश धुलने छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात केवळ २९ धावा केल्या. एवढेच नाही तर संपूर्ण संघ केवळ २९५ धावांवरच गडगडला. परंतु संघावर मोठ्या पराभवाचे संकट ओढावले होते. पण, या संकटाच्या काळात युवा खेळाडू यश धुलने मोठा चमत्कार केला. यश धुलने छत्तीसगडविरुद्ध दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले असून, हे त्याचे रणजी ट्रॉफीमधील तिसरे शतक आहे. या शतकामुळे दिल्लीने छत्तीसगडवरही आघाडी घेतली आहे.

छत्तीसगडने पहिल्या डाव्यात ९ बाद ४८२ धावा केल्या होत्या. यश धूल व्यतिरिक्त दिल्लीचा दुसरा सलामीवीर ध्रुव शौरे यानेही दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले.


हेही वाचा : मोठ्या पदावरच्या व्यक्तींनी अनावश्यक वक्तव्य करू नये, मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा राज्यपालांना टोला


 

First Published on: March 6, 2022 2:21 PM
Exit mobile version