Youth Olympic Games 2018 : सिमरनला रौप्यपदक

Youth Olympic Games 2018 : सिमरनला रौप्यपदक

कुस्तीपटू सिमर

अर्जेन्टिनाची राजधानी ब्यूनोस एयर्स येथे सुरू असलेल्या युथ ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू सिमरनने रौप्यपदकाची कमाई केली. ४३ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिचा अमेरिकेच्या एमिली शील्सन हिने सिमरनचा ११-६ असा पराभव केल्याने तिला रौप्यपदक मिळाले.

पहिल्याच सत्रात ९-२ ने मागे 

सिमरनने या सामन्याची सुरूवात चांगली केली नाही. त्यामुळे पहिल्याच सत्रात एमिली शील्सनने ९-२ अशी मोठी आघाडी मिळवली. यानंतर दुसऱ्या सत्रात सिमरनने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतकी मोठी आघाडी कमी करण्यात तिला अपयश आल्याने सिमरनने हा सामना ११-६ असा गमावला. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेतील पाचवे रौप्यपदक
हे भारताचे या स्पर्धेतील पाचवे रौप्यपदक ठरले आहे. याआधी तुषार माने (शूटिंग), मेहूली घोष (शूटिंग), तबाबी देवी (ज्युडो) आणि लक्ष्य सेन (बॅडमिंटन) यांनी रौप्यपदके पटकावली होती. मेहूली घोषचे सुवर्णपदक अवघ्या ०.८ गुणांनी हुकले होते.
First Published on: October 14, 2018 10:23 PM
Exit mobile version