दृष्टिहीनांच्या T20 विश्वचषकासाठी युवराज सिंग ब्रँड अॅम्बेसेडर

दृष्टिहीनांच्या T20 विश्वचषकासाठी युवराज सिंग ब्रँड अॅम्बेसेडर

युवराज

मुंबई : क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडियाने (CABI) दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंगची भारतात होणाऱ्या दृष्टिहीनांसाठी तिसऱ्या T-20 विश्वचषकासाठी ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून घोषणा केली. तिसऱ्या T-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अजय कुमार रेड्डी B2 (आंध्र प्रदेश) कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व करेल तर वेंकटेश्वर राव दुन्ना – B2 (आंध्र प्रदेश) उपकर्णधार असेल. विश्वचषकाचे सामने 6 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2022 या कालावधीत खेळवले जाणार आहेत.

दृष्टिहीनांच्या तिसऱ्या T-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत, नेपाळ, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. गतविजेते भारत आणि नेपाळ यांच्यात 6 डिसेंबर रोजी फरीदाबाद येथे उद्घाटन सामना खेळवला जाणार आहे.

“मला ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून दृष्टिहीनांच्या तिसऱ्या T-20 विश्वचषक क्रिकेटचा एक भाग बनून आनंद झाला आहे. मी क्रिकेटची आवड आणि दृष्टिहीन क्रिकेटपटूंच्या दैनंदिन आव्हानांशी लढण्याच्या निर्धाराची प्रशंसा करतो. हे एक वेगळं जग आहे, पण हे क्रिकेटचे जग आहे आणि क्रिकेटला सीमा नसतात. माझा असा विश्वास आहे की या खेळाने मला कसे लढायचे, कसे पडायचे, पुन्हा कसे उठायचे आणि स्वत: वर कसे यायचे हे शिकवले. म्हणूनच मी सर्वांना विनंती करतो आणि आमंत्रित करतो की पुढाकार घेऊन या महान उपक्रमाला पाठिंबा द्या”, असे युवराज सिंग म्हणाला.

विश्वचषक हा समर्थनाम ट्रस्ट फॉर दि डिसेबलचा एक उपक्रम आहे, जो 2012 पासून चॅम्पियनशिपचे आयोजन करत आहे. समर्थनम खेळांना समावेशकता सुधारण्याचे आणि विविध आघाड्यांवर अपंग व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचे साधन मानते. स्थापनेपासून, ट्रस्ट 25,000 पेक्षा जास्त दृष्टिहीन क्रिकेटपटूंपर्यंत पोहोचले आहे. समर्थनमची क्रीडा शाखा, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) ची स्थापना 2010 मध्ये अंध क्रिकेट खेळाडूंच्या क्रिकेटच्या स्वप्नांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अंधांना क्रिकेटच्या खेळातील त्यांची अमर्याद प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली. क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) वर्ल्ड ब्लाइंड क्रिकेट लिमिटेड (WBC) शी संलग्न आहे.

क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया (CABI) समितीने जुलैपासून बेंगळुरू येथे प्रशिक्षण शिबिरासाठी अव्वल 56 खेळाडूंची निवड केली होती. निवड समितीने भोपाळमध्ये 12 दिवस कठोर क्रिकेट प्रशिक्षण आणि तंदुरुस्तीचे मूल्यांकन करून पुढील मूल्यमापन केल्यानंतर अव्वल 29 खेळाडूंची निवड करण्यात आली. निवड समितीने आता अंधांच्या तिसऱ्या T-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी अंतिम 17 भारतीय संघाची निवड केली आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतातील अनेक शहरांमध्ये एकूण 24 सामने खेळवले जाणार आहेत.

भारतीय संघ – 17 खेळाडू : खेळाडू श्रेणी (B1 – पूर्णपणे अंध, B2 – अंशतः अंध – 2 ते 3 मीटर अंतरावर, B3 – आंशिक दृष्टी – 3 ते 6 मीटर दृष्टी) :


हेही वाचा – टी-20 विश्वचषक : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 89 धावांनी पराभव; न्यूझीलंडचा दमदार विजय

First Published on: October 22, 2022 6:00 PM
Exit mobile version