‘तु फायटर आहेस…’; युवराजने दिला संजय दत्तला खास संदेश

‘तु फायटर आहेस…’; युवराजने दिला संजय दत्तला खास संदेश

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यात किती चढउतार आले हे सर्वश्रुत आहे. पुन्हा एकदा संजय दत्त समोर नवं संकट उभं ठाकलं आहे. संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. त्यामुळे उपचार घेण्यासाठी तो परदेशातही जाण्याची शक्यता आहे. वैद्यकीय उपचारांसाठी काही काळ चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्याची माहिती संजय दत्तने दिली होती. अनेकांनी त्याच्या प्रकृतीसंदर्भात संदेश दिले आहेत. कर्करोगावर यशस्वीपणे मात करणाऱ्या युवराज सिंगने देखील संजय दत्तला खास संदेश दिला.

“संजय दत्त, आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की तू लढाऊ वृत्तीचा होतास आणि नेहमीच राहशील. कर्करोगाच्या आजारातील होणाऱ्या वेदना मला माहिती आहेत. पण मला हे देखील माहिती आहे की तू या संकटाला धैर्याने सामोरा जाशील आणि कर्करोगावर मात करशील. मी तुझ्यासाठी प्रार्थना करतोच आहे. तू लवकर तंदुरूस्त हो,” असा संदेश युवराजने संजय दत्तला दिला.


हेही वाचा – पंतप्रधान मोदी उद्या प्रामाणिक करदात्यांना देणार ‘गिफ्ट’


 

First Published on: August 12, 2020 3:10 PM
Exit mobile version