Telegramवर Whatsappची कृपा; ७२ तासांत वाढले कोट्यावधी युजर्स

Telegramवर Whatsappची कृपा; ७२ तासांत वाढले कोट्यावधी युजर्स

Telegram New Features: आता व्हॉट्सॲप प्रमाणे टेलीग्रामवर करु शकतो ग्रुप व्हिडिओ कॉल

टेलिग्रामवर केवळ ७२ तासांत तब्बल कोट्यावधी युजर्स जोडल्याची माहिती समोर आली आहे. टेलिग्रामवर या कंपनीने हे युजर्स जगभरातून जोडले असून यामध्ये सर्वात मोठा वाटा हा आशियातील युजर्सचा आहे. मात्र, ही जी कृपा घडली आहे ती केवळ आणि केवळ whatsappमुळे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की, whatsappने अशी टेलिग्रामवर काय कृपा केली असावी. तर ती कृपा म्हणजे whatsappची नवीन पॉलिसी. हो!. कारण whatsappच्या या नवीन पॉलिसीमुळे अनेक युजर्सने टेलिग्रामवर App चा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

७२ तासात अडीच कोटी युजर्स

टेलिग्रामवर कंपीनीने दिलेल्या माहितीनुसार, केवळ ७२ तासात अडीच कोटी नवीन युजर्स जोडले गेले आहेत. यामध्ये आशियातील ३८ टक्के, युरोपमधील २७ टक्के, लॅटिन अमेरिकेतील २१ टक्के आणि ८ टक्के MENAतून आले आहेत. त्यामुळे आता टेलिग्रामने एकूण ५०० मिलियन युजर्सचा आकडा पार केला आहे.

whatsappमुळे वाढले इतर Appचे युजर्स

WhatsAppने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीमुळे इतर मॅसेजिंग अॅपचे युजर्स वाढले आहेत. WhatsAppने पॉलितीत बदल केल्यानंतर भारतातील सिग्नल आणि टेलिग्रामची संख्या ४० लाखांपर्यंत वाढली गेली. सिग्नलने या स्पर्धेत बाजी मारली आहे. ६ जानेवारी ते १० जानेवारीपर्यंत २.३ मिलियन नवीन डाउनलोडसोबत टॉप स्पॉट मिळवले आहे. तर टेलिग्रामने या दरम्यान १.५ मिलियन नवीन डाउनलोड मिळवले आहेत.

युजर्सना हवी फ्री आणि आपली प्रायव्हसी

WhatsAppने आणलेल्या प्रायव्हसीमुळे WhatsAppच्या युजर्सना कुठेतरी भिती वाटत आहे. तसेच ती प्रायव्हसी सिलेक्ट न केल्यास येत्या ८ फेब्रुवारीपासून त्या करता पैसे आकारण्यात येणार आहे. त्यामुळे आता युजर्सना फ्री आणि आपली प्रायव्हसी हवी आहे. त्यामुळे आमचे युजर्स वाढत आहेत.  – पॉवेल डुरॉव; टेलिग्राम


हेही वाचा – कुत्रा कुत्रीच दणक्यात लग्न, हजारो वऱ्हाडींच्या उपस्थितीत उडाला बार


First Published on: January 13, 2021 6:18 PM
Exit mobile version