Jio फोन ग्राहकांसाठी रिचार्जशिवाय ३०० मिनिटांचे विनामूल्य Outgoing calling

Jio फोन ग्राहकांसाठी रिचार्जशिवाय ३०० मिनिटांचे विनामूल्य Outgoing calling

Jio ची देशभरात हायस्पीड ब्रॉडबॅंड इंटरनेची सेवा, SES सोबत भागीदारीची घोषणा

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ लॉकडाऊन किंवा इतर कारणांमुळे रिचार्ज करण्यास असमर्थ असणार्‍या आपल्या जिओफोन ग्राहकांना ३०० मिनिटांचे विनामूल्य आउटगोइंग कॉलिंग सेवा देणार आहे.  रिचार्ज न करता, जिओफोन ग्राहक आता दररोज 10 मिनिटे त्यांच्या मोबाइलवर बोलता येणार आहे. कंपनी दररोज १० मिनिटांसाठी या हिशोबाने महिन्याला ३०० मिनीटे विनामूल्य आउटगोइंग कॉलिंग सेवा देणार आहे. इनकमिंग कॉल पूर्वीप्रमाणेच विनामूल्य राहतील. कंपनीने जाहीर केले आहे की साथीच्या काळात ही सुविधा सुरू राहील. त्याचा फायदा कोट्यवधी जिओफोन ग्राहकांना होईल.

देशातील बहुतेक राज्ये लॉकडाऊन आहेत, लोक घरात कैद आहेत. अशा परिस्थितीत मोबाइल रिचार्ज करणे कठीण झाले आहे. विशेषत: वंचित लोकांसाठी हे एक अतिशय कठीण काम आहे. रिलायन्स जिओने केवळ जिओफोन ग्राहकांना या कोंडीतून मुक्त करण्यासाठी ही ऑफर आणली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की साथीच्या काळात कंपनीला याची खात्री करून घ्यायची आहे की समाजातील वंचित घटक सुद्धा मोबाइल द्वारे कनेक्टेड राहतील.

रिलायन्स जिओची मोबाईल रिचार्ज करणार्‍या जियोफोन ग्राहकांसाठी एक विशेष योजना देखील करण्यात आली आहे.  जिओफोनच्या प्रत्येक रिचार्जवर, कंपनी त्याच किंमतीची अतिरिक्त रिचार्ज फ्री देणार आहे. म्हणजे जिओफोन ग्राहकाने 75 रुपयांच्या 28 दिवसांच्या वैधतेसाठी असणाऱ्या प्लॅन चे रिचार्ज केले तर त्याला 75 रुपयांचे आणखी एक विनामूल्य रिचार्ज मिळेल, जे ग्राहकला पहिला रिचार्ज संपल्यानंतर वापरता येईल

रिलायन्स फाउंडेशन रिलायन्स जिओबरोबर लोकांना मोबाइल नेटवर्कद्वारे जोडून ठेवण्यासाठी काम करत आहे. रिलायन्स जिओने आपल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोना साथीने देशासमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे आणि यावेळी रिलायन्स प्रत्येक भारतीयांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून उभे आहे.


हेही वाचा – गुडन्यूज! लॉकडाऊनमध्येही Amazon देणार ७५,००० लोकांना रोजगार

 

First Published on: May 14, 2021 12:33 PM
Exit mobile version