Airtel कंपनी ‘या’ ग्राहकांना देतेय 1000GB डेटा!

Airtel कंपनी ‘या’ ग्राहकांना देतेय 1000GB डेटा!

Airtel कंपनी 'या' ग्राहकांना देतेय 1000GB डेटा!

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. कंपनीने आपल्या एअरटेल एक्सट्रीम फायबर ग्राहकांना 1000GB पर्यंत अॅडिशनल डेटा मोफत देत आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. ही ऑफर फक्त नवीन ग्राहकांसाठी असणार आहे.

कंपनीच्या नवीन ग्राहकांना 1000GB डेटा मोफत देत असून या डेटाची वैधता सहा महिने असणार आहे. ही ऑफर देशातील काही निवडक शहरांमध्ये उपलब्ध आहे. मर्यादित कालावधीची ही ऑफर आहे आणि ७ जून पर्यंत वॅलिड आहे. टेलिकॉमटॉकच्या अहवालानुसार ही ऑफर चेन्नई, कोयंबतूर, कोची आणि एर्नाकुलम सारख्या शहरांमध्ये उपलब्ध आहे.

सध्या एअरटेल अनेक ब्रॉडबँड प्लॅन्सची ऑफर करत आहे. बेसिक प्लॅनची किंमत ७९९ रुपये आहे आणि प्रत्येक महिन्याला 100Mbps स्पीडसोबत 150GB डेटा दिला जातो. तर एंटरटेनमेंट प्लॅनची ९९९ रुपये किंमत असून यामध्ये 200Mbps स्पीडसोबत प्रत्येक महिना 300GB डेटा दिला आहे.

प्रीमियम प्लॅनची किंमत १ हजार ४९९ असून यामध्ये 300Mbps स्पीडसोबत 500GB पर्यंत डेटा दिला आहे. कंपनी या सगळ्या प्लॅनसोबत एअरटेल एक्सट्रीम सब्सक्रिप्शन मोफत देते आहे. दरम्यान अॅमझॉन प्राइम आणि जी५ सब्सक्रिप्शनचा फायदा फक्त एंटरटेनमेंट आणि प्रीमियम प्लॅन्समध्ये दिले जातात.

याशिवाय कंपनीने एअरटेल एक्सट्रीम फायबर ब्रॉडबँड सेवा मोफत इंस्टॉलेशन देत आहे आणि लाँग टर्म प्लॅन्सवर १५ टक्के सूटही देत आहे. त्याचबरोबर कंपनीने आपल्या प्रीपेड ग्राहकांना २५१ रुपयांचा डेटा व्हाउचर देणे सुरू केले आहे. कंपनीच्या २५१ रुपयांच्या डेटा व्हाउचरमधील ग्राहकांना 50GB डेटा देण्यात येत आहे.


हेही वाचा – वनप्लस ८ च्या विक्रीला आजपासून सुरुवात, जाणून घ्या किमत


 

First Published on: June 5, 2020 10:42 PM
Exit mobile version