एलियनचा शोध लागला? नव्या पृथ्वीवर आहेत एलियन!

एलियनचा शोध लागला? नव्या पृथ्वीवर आहेत एलियन!

( फोटो प्रातिनिधीक आहे.)

आतापर्यंत आपण फक्त सिनेमांमधून एलियन पाहिले आहेत किंवा व्हायरल व्हिडिओमधून एलियनची तबकडी देखील पाहिली आहे. पण आता एलियन खरेखुरे आहेत. पृथ्वीपेक्षा मोठा आणि नेपच्युन ग्रहापेक्षा लहान अशी दुसरी पृथ्वी सापडली असून या ठिकाणी जीवसृष्टी असण्याच्या अनेक खूणा सापडल्या आहेत. येथील जीवसृष्टी म्हणजेच आपण इतक्या वर्ष विचार करत असलेले एलियन या ठिकाणी असू शकतात.

वाचा- पृथ्वीला एक नाही तर तीन चंद्र

काय आहे नव्या पृथ्वीसदृश्य ग्रहाची वैशिष्टये ?

अंतराळात अनेक सौरमाला आहेत. पण पृथ्वीजवळ असणाऱ्या सौरमालेत पृथ्वीसारखाच ग्रह सापडला आहे. ज्यावर जीवसृष्टी असण्याची शक्यता आधीच व्यक्त करण्यात आली आहे. या ग्रहापासून सूर्य दूर असल्यामुळे हा नवा ग्रह बर्फाने आच्छादलेला आहे. या ग्रहावर पाणी आहे म्हणजेच जीवसृष्टी १०० टक्के असेल असा विश्वास देखील शास्त्रज्ञांना आहे.

लवकरच लागेल एलियनचा शोध?

शास्त्रज्ञांनी लावलेल्या या शोधाचा अधिक अभ्यास सुरु आहे. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत लावलेल्या शोधात काही ठराविक गोष्टींचा शोध लागला असला तरी याचा अधिक अभ्यास करण्यासाठी लागणारी वैशिष्ट्यपूर्ण टेलिस्कोप तयार करण्याचे काम सुरु आहे.अशी दुर्बिण तयार झाल्यानंतर या ग्रहावर आपल्यासारखी माणसे आहेत की, एलियन सदृश्य माणसे आहेत याचा शोध लागू शकेल.

वाचा –भारतीय शास्त्रज्ञांनी लावला नवीन ग्रहाचा शोध
First Published on: November 17, 2018 1:17 PM
Exit mobile version