Amazon चे फाऊंडर जेफ बेजोस सोडणार CEO पद; अँडी जेसी यांच्याकडे नवी जबाबदारी

Amazon चे फाऊंडर जेफ बेजोस सोडणार CEO पद; अँडी जेसी यांच्याकडे नवी जबाबदारी

Amazon चे फाऊंडर जेफ बेजोस यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात (CEO) हे पद सोडणार असल्याची घोषणा केली. ही घोषणा त्यांनी मंगळवारी केली असून या वर्षाच्या अखेरपर्यंत जेफ बेजोस हे कंपनीच्या CEO पदाचा राजीनामा देणार आहे. जेफ बेजोस यांनी Amazon कंपनीची सुरूवात एका स्टार्टअपच्या स्वरुपात केली होती आणि सध्या ही कंपनी जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक प्रसिद्ध कंपनी बनली आहे.

वृत्तसंस्था एएफपीच्या मते, अ‍ॅमेझॉनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अँडी जेसीची जागा घेणार असल्याची घोषणा बेजोस यांनी केली. अँडी सध्या अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे प्रमुख आहेत. ही नवी जबाबदारी अँडी जेसी लवकरच घेणार आहे. तसेच बेजोस यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘अ‍ॅमेझॉनच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांशी’ मी नेहमी संपर्कात असेलच. मात्र यापुढे कल्याणकारी योजना म्हणजेच Day One Fund आणि Bezos Earth Fund वर मी लक्ष केंद्रीत करणार आहे.

बेजोस यांनी केलेल्या घोषणेनंतर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक ट्विट केले आहे. यावेळी सुंदर पिचाई यांनी अँडी जेसी यांना त्याच्या नव्या जबाबदारीसाठी तसेच Amazon चे फाऊंडर जेफ बेजोस यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

५७ वर्षीय बेजोसने १९९४ मध्ये आपल्या घरच्या गॅरेजमधून त्यांनी त्यांच्या Amazon कंपनीची सुरूवात केली. ऑनलाइन रिटेलमधील Amazon कंपनी हे सर्वात मोठे नाव असून Amazonने आता ग्रोसरी, स्ट्रिमिंग सर्विसेस, टीव्ही, क्लाऊड कम्प्यूटिंग, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासह अनेक क्षेत्रात काम केले आहे. बेजोस हे अ‍ॅमेझॉन कंपनीशिवाय, वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्र आणि खाजगी स्पेस कंपनी ब्लू ओरिजिनचे मालक देखील आहेत.

First Published on: February 3, 2021 10:48 AM
Exit mobile version