Amazon Prime Day Sale : अ‍ॅमेझॉन सेलची घोषणा; टीव्ही स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर

Amazon Prime Day Sale : अ‍ॅमेझॉन सेलची घोषणा; टीव्ही स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर

अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलची घोषणा

अ‍ॅमेझॉनने त्यांच्या Amazon Prime Day Sale ची घोषणा केली आहे. हा सेल २६ आणि २७ जुलैला असणार आहे. २६ जुलै रोजी मध्यरात्री १२ वाजता हा सेल सुरू होईल. या सेलमध्ये टीव्ही, स्मार्टफोन्स आणि इतर प्रोडक्ट्सवर बंपर ऑफर मिळणार आहे. भारतातील अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलचा यंदा पाचवा वर्धापन दिन आहे.

Amazon Prime Day Sale दरम्यान ३०० हून अधिक नवे प्रोडक्ट्स लाँच केले जाणार आहेत. हा सेल प्राइम मेंबर्ससाठी ओपन असेल. ज्यांकडे प्राइम मेंबरशिप नाही, ते सबस्क्रिप्शन घेऊन प्राइम डे सेलमधील एक्सिक्लूसिव्ह डील्स आणि ऑफर्सचा लाभ घेऊ शकतील.

या सेलमध्ये सॅमसंग, शाओमी, विप्रो, बजाज ब्रँड्सकडून ३०० हून अधिक नवीन उत्पादने अ‍ॅमेझॉनवर सेलमध्ये असतील . अ‍ॅमेझॉनने नमूद केलं आहे की या विक्रीमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, उपकरणे, इलेक्ट्रॉनिक्स, अ‍ॅमेझॉन डिव्हाइस आणि अशा बऱ्याच अन्य विविध श्रेणीतील ऑफर्सचा सेलमध्ये समावेश असेल.

काय आहेत ऑफर?

एसएमबीद्वारे (SMB ) देण्यात येणाऱ्या उत्पादनांमधून प्राईम सदस्यांना १० टक्के म्हणजे साधारण १५० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकेल. सेलच्या दिवशी प्राईम सदस्यांना एचडीएफसी बँक डेबिट, क्रेडिट कार्ड आणि ईएमआय व्यवहारांसह १० टक्के त्वरित सूट देखील मिळेल. तुम्ही अ‍ॅमेझॉन पे वापरल्यास १००० रुपये कॅशबॅक मिळेल. अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डचा वापर करून प्राइम डे खरेदीवर प्राइम सदस्यांना ५ टक्के क्रेडिट पॉइंट्स मिळतील.

सेल दरम्यान ज्या स्मार्टफोन्सवर सूट मिळणार आहे त्याची कंपनीने माहिती दिली आहे. या स्मार्टफोन्समध्ये OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10S, Redmi Note 10 Pro Max, iPhone 11 and OnePlus 9R 5G, Redmi Note 10 यांचा समावेश आहे.

 

First Published on: July 10, 2021 12:13 PM
Exit mobile version