आता कॉल रेकॉर्ड करता येणार नाहीत, Google ने घेतला मोठा निर्णय

आता कॉल रेकॉर्ड करता येणार नाहीत, Google ने घेतला मोठा निर्णय

अँड्रॉईड युजर्सच्या सुरक्षेला लक्षात घेऊन गुगल कठोर पावले उचलणार आहे. आता वापरकर्त्यांसाठी कॉल रेकॉर्ड करणे पूर्वीसारखे सोपे राहणार नाही. तुम्ही कॉल रेकॉर्डसाठी कोणतेही थर्ड पार्टी ॲप वापरत असल्यास, ११ मे पासून तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकणार नाही.

गुगल आपले धोरण बदलत आहे. यामुळे आता गुगल प्ले स्टोअरवर कॉल रेकॉर्ड करणारे अॅप्स आता दिसणार नाहीत. कारण गुगलच्या नवीन धोरणानुसार, Play Store वरील कॉल रेकॉर्डिंग ॲप Truecaller बंद होणार आहे. मात्र, या ॲप्सची इतर सुविधा वापरता येतील. त्याच वेळी, ॲप डेव्हलपर वापरकर्त्यांसाठी कॉल रेकॉर्डिंग सुविधा देखील देऊ शकणार नाहीत.

वापरकर्ते ११ मे २०२२ नंतर कॉल रेकॉर्ड करू शकणार नाहीत, जर त्यांच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डर इनबिल्ट नसेल. तुमच्‍या स्‍मार्टफोनमध्‍ये कॉल रेकॉर्डिंग इनबिल्ट असल्‍यास, ते पूर्वीप्रमाणेच काम करत राहील. म्हणजेच तुमच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगचा पर्याय असेल तर तुम्ही कोणताही कॉल रेकॉर्ड करू शकाल. कॉल रेकॉर्डिंग ऑफर करणारे फोन Xiaomi, काही Samsung आणि Google Pixel फोन आहेत.

गुगल काही काळापासून Android डिव्‍हाइससवर कॉल रेकॉर्डिंग बंद करण्‍यासाठी काम करत आहे. Android 6 वर रीअलटाइम कॉल रेकॉर्डिंगचा प्रवेश ब्लॉक करण्याच आला आहे आणि Android 10 वरील मायक्रोफोनवर कॉल रेकॉर्डिंग प्रतिबंधित केले. दुसरीकडे, आयफोनमध्ये थर्ड पार्टीद्वारे कॉल रेकॉर्डिंग आधीच उपलब्ध नाही.

 

First Published on: April 22, 2022 9:56 AM
Exit mobile version