नव्या 70 इमोजीसह अ‍ॅपल येतोय

नव्या 70 इमोजीसह अ‍ॅपल येतोय

Apple emojis

सध्या इमोजीचा काळ आहे. अँड्रॉइड आणि अ‍ॅपल या दोन्ही कंपन्या वेळोवेळी नवीन इमोजी लोकांसाठी आणत असतात आणि आता अ‍ॅपलने ७० नवे इमोजी लोकांसाठी आणलेले आहेत. हे इमोजी अ‍ॅपलच्या iOS, macOS and watchOS या हॅण्डसेटच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये अ‍ॅड करण्यात येतील. या नव्या इमोजीमध्ये मून केक, रेड गिफ्ट इन्वोलप, नझर अ‍ॅम्युलेट, सॉफ्ट बॉल, लगेज, कंपास, इल्लामा मोश्क्युटो, स्वान, रॅकन, कपकेक तसेच लाल, राखाडी रंगाचे केस आणि कुरळे केस तसेच इतर इमोजीसचा समावेश करण्यात आला आहे.

अ‍ॅपलच्या ११.० व्हर्जनसाठी या इमोजी आणलेल्या आहेत. अ‍ॅपल युनिकोडसोबत मिळून युनिकोडच्या १२.० किबोर्डवर चालतील असे नवे अपंगत्वाशी संबंधित काही इमोजी आणले जाणार आहे. हे सर्व इमोजी २०१९ मध्ये अ‍ॅपलच्या किबोर्डवर उपलब्ध होतील. सध्या अ‍ॅपलच्या i OS, watch OS and mac OS या व्हर्जनवर हसणारे चेहरे, कपड्यांचे विविध पर्याय, पदार्थ, प्राणी इत्यादी इमोजी उपलब्ध आहेत.स्पोर्ट्सच्या फॅनसाठी सुद्धा काही नवीन इमोजी आणलेल्या आहेत.यातल्या काही इमोजी या world emoji day च्या दिवशी दाखवण्यात आल्या होत्या. युनिकोडच्या १२.० किबोर्डवर चालतील अशा काही इमोजी या २०१९ साली लोकांसमोर आणल्या जातील.

First Published on: October 19, 2018 12:18 AM
Exit mobile version