अॅपलचे तीन नवे स्मार्ट फोन लाँच; भारतात या किंमतीत मिळणार

अॅपलचे तीन नवे स्मार्ट फोन लाँच; भारतात या किंमतीत मिळणार

आयफोनचे तीन नवे स्मार्टफोन लाँच

स्मार्टफोनच्या दुनियेत अग्रभागी असलेल्या अॅपलने तीन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. एका मेगा इव्हेंटमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी आयफोन Xs (iPhone Xs), आयफोन Xs Max (iPhone Xs Max), आणि आयफोन XR (iPhone XR) आणि अॅपल वॉच सीरीज ४ लाँच केली आहे. यापैकी iPhone Xs आणि iPhone Xs Max हे दोन फोन ६४, २५६ आणि ५१२ जीबी स्टोरेज पर्यायामध्ये ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. तर iPhone XR फोनमध्ये ६४, १२८ आणि २५६ जीबी स्टोरेजचा पर्याय देण्यात आला आहे. कॅलिफोर्नियाच्या अॅपल पार्कमधील स्टीव जॉब्स सभागृहात हा मेगाइव्हेंट पार पडला. या तीन फोनसोबत अॅपल वॉच ४ देखील लाँच झाले आहे. यामध्ये नवे हार्ट फिचर असून लो हार्ट रेट, हार्ट रिदम आणि ईसीजी असे तीन वैशिष्टे देण्यात आली आहेत.

iPhone XR ची किमंत सध्या ७४९ अमेरिकन डॉलर आहे. तसेच iPhone Xs ची ९९९ डॉलर तर iPhone Xs Max १,०९९ डॉलरमध्ये उपलब्ध आहे. तीनही फोनची प्री बुकिंग १४ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. इतर देशांमध्ये २१ सप्टेंबर पर्यंत फोनची डिलीव्हरी केली जाईल. तर भारतात iPhone Xs आणि iPhone Xs Max ची डिलीव्हरी २८ सप्टेंबर रोजी करण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे.

अॅपलने आतापर्यंत जेव्हा जेव्हा त्यांचे एखादे नवे प्रॉडक्ट लाँच केले, तेव्हा तेव्हा जगभरातील सर्वच देशात त्याचे उत्साहात स्वागत केले गेले. भारतातही या तीन फोनबद्दल प्रचंड कुतूहल आहे. भारतात iPhone XS – ६४ जीबी फोनची किमंत ९९,९०० तर ६४ जीबीच्या iPhone XS Max ची किमंत एक लाख ९ हजार असणार आहे. हे दोनही फोन २८ सप्टेंबर २०१८ रोजी भारतात उपलब्ध होणार आहेत. मात्र iPhone XR साठी भारतीयांना थोडी वाट पाहावी लागेल. कारण हा फोन भारतात पुढच्या महिन्यात २६ ऑक्टोबर रोजी उपलब्ध होईल. त्याची किमंत ७६,९०० रुपये असू शकेल. तर त्याची प्री बुकिंग १९ ऑक्टोबर पासून सुरु होईल.

ईसीजी काढणारं अॅपल वॉच

या इव्हेंटमध्ये अॅपल वॉच सीरीज ४ लाँच केले गेले. आकर्षक डिझाईन सोबत अफलातून फिचर्स घेऊन हे वॉच आले आहे. हार्ट रिदम मोजण्यासहित यातून ईसीजी देखील काढता येणार आहे. हृदयाशी संबंधित आजारासाठी या वॉचमला डेटा डॉक्टरांच्या कामी येणार आहे. तुमचा डेटा तुम्ही iPhone मध्ये सुरक्षित ठेवू शकता आणि डॉक्टरांसोबत शेअर करु शकता. सेल्युलर आणि जीपीएस असलेल्या या वॉचची किमंत अमेरिकेत ४९९ डॉलर आणि केवळ जीपीएस वॉच सीरीजची किमंत ३९९ डॉलर असणार आहे.

First Published on: September 13, 2018 1:09 PM
Exit mobile version