आता कोणीही तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करू शकत नाही; नवं फीचर

आता कोणीही तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये अॅड करू शकत नाही; नवं फीचर

सोशल मीडियावर सर्वात जास्त वापरण्यात येणाऱ्या अॅपपैकी व्हाट्सअॅपने ग्रुप प्रायव्हसी संदर्भातील एक फीचर जागतिक स्तरावर सादर केले आहे. युजर्स आता स्वतःच्या व्हॉट्सअॅपवर नियंत्रण मिळवू शकतात. या फीचरचा वापर करून युजर्स त्यांना ज्या ग्रुपमध्ये अॅड व्हायचे किंवा नाही याचा सर्वस्वी निर्णय घेण्यास ते सक्षम असणार आहे. या फीचरला पूर्वी बीटा व्हर्जनमध्ये सादर केले होते. गेल्या महिन्यात आयफोनच्या काही युजर्सकरता व्हाट्सअॅपने हे फीचर सादर केले होते. त्याचप्रकारे आता Android आणि iOS च्या युजर्सकरता हे फीचर सादर केले आहे.

असा वापर करा या नव्या फीचरचा

ग्रुप सेटिंग फीचरचा वापर करण्याकरता युजर्सना अ‍ॅपच्या सेटिंग्जवर जावे लागेल. त्यानंतर Account या पर्यायावर जाऊन Privacy या पर्यायावर क्लिक करून ग्रुपवर क्लिक करा.

त्यानंतर तुम्हाला Contacts Except… हा पर्याय दिसेल. या पर्यायावरून तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये अॅड व्हायचे किंवा नाही, यांवर नियंत्रण ठेवता येईल.

या फीचरच्या सहाय्याने जो व्यक्ती आपल्याला स्वतःच्या ग्रुपमध्ये अॅड होण्यास प्रतिबंध करेल तो आपल्याला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करण्यासाठी प्रायव्हेट मॅसेज इनव्हाइट पाठवू शकेल. हे इनव्हाइट स्विकारण्यासाठी तुमच्याकडे तीन दिवस असणार आहे. त्यानंतर ते इनव्हिटेशन एक्सपायर होईल.

हे युजर्सच नवं फीचर वापरू शकतात

यापूर्वी व्हॉट्सअॅपने एक नवीन सॉफ्टवेअर अपडेट सादर केले होते. या नव्या अपडेटला Google Play beta programme channelवर रोल आऊट करण्यात आले आहे. हे नवं फीचर फक्त बीटा व्हर्जन असणारे युजर्स वापरू शकतात.


WhatsApp Pegasus : मे महिन्यातच सरकारला कळवल्याचा व्हॉट्सअॅपचा दावा!
First Published on: November 7, 2019 2:39 PM
Exit mobile version