खगोलशास्त्रज्ञांना सापडली आणखी एक पृथ्वी?

खगोलशास्त्रज्ञांना सापडली आणखी एक पृथ्वी?

वोल्फ- ५०३ बी (फोटो प्रातिनिधीक आहे.)

नासा, इस्रो त्यांच्या वेगवेगळ्या अंतराळ मोहिमेतून वेगवेगळ्या ग्रहांचे बारकाव्यांचा अभ्यास करत आहे, आता नासाच्या संशोधनात अशी एक गोष्ट समोर आली आहे की, ज्यामुळे कदाचित आपल्यासारखी माणसे किंवा आपल्यापेक्षा अधिक प्रगत अशी जीवसृष्टी पाहायला मिळण्यासाची शक्यता आहे. शास्त्रज्ञांना एका नव्या ग्रहाचा शोध लागला अशून ही पृथ्वीपेक्षा हा ग्रह आकाराने दुप्पट असून पृथ्वीपासून १४५ प्रकाशवर्ष हा ग्रह दूर आहे.

शास्त्रज्ञांनी काय दिली माहिती?

एक्सप्लानेट वोल्फ ५०३ बी अर्थातच पृथ्वी सदृश्य हा ग्रह हा कन्या नक्षत्रात आहे. त्याच्या काही अंतरावर असलेल्या त्रिज्येमध्ये एक तारा आहे. प्रत्येक ६ दिवसात हा ग्रह या ताऱ्याभोवती भ्रमण करतो. त्यामुळे हा ग्रह बुधपेक्षा १० पट पृथ्वीच्या जवळ आहे. त्यामुळे त्याचा अधिक अभ्यास करणे सोपे असणार आहे, त्यामुळे त्याचे वास्तविक स्वरुपाचा अभ्यास करणे सोपे ठरणार असल्याचे नासाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

अतिशय तेजस्वी ग्रह

वुल्फ ५०३ बी हा अतिशय तेजस्वी ग्रह असल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे. पृथ्वीपेक्षा मोठा असलेला हा ग्रह भौगोलिक दृष्ट्या वेगळा असणार असा अंदाज देखील खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. शिवाय या ग्रहाजवळ असलेला तारा देखील तितकाच खास आणि वेगळा आहे. या ताऱ्याच्या तेजस्वीपणामुळेच हा ग्रह अधिक तेजस्वी दिसतो. या ताऱ्याचा रंग नारिंगी असून सूर्यापेक्षा हा तारा लहान असला तरी या ताऱ्याचे आर्युमान सूर्यापेक्षा अधिक असल्याचे देखील नासाकडून सांगण्यात आले आहे.

(सौजन्य- सायन्स चॅनेल)

पुढील काळात करणार अभ्यास

नासाच्या अनेक मोहिमा सुरु आहेत. पण दुसऱ्या पृथ्वीचा शोध ही महत्वपूर्ण मोहीम असणार आहे. त्यामुळे आता नासा कशाप्रकारे याचा अभ्यास करणार हे पुढील काळात कळेल. पण या ग्रहावर आपल्यासारखी माणसे असतील का? किंवा त्यावर जीवसृष्टी कशी असेल हे पाहणे महत्वाचे ठरणार हे नक्की!

First Published on: September 12, 2018 12:25 PM
Exit mobile version