Alert: आजपासून ‘या’ SIM Cardsवर इन्कमिंग आणि आऊटगोइंग कॉल बंद होणार

Alert: आजपासून ‘या’ SIM Cardsवर इन्कमिंग आणि आऊटगोइंग कॉल बंद होणार

संग्रहित छायाचित्र

गेल्या वर्षी ७ डिसेंबर २०२१ रोजी दूरसंचार विभागाने ९ हून अधिक सिम कार्ड ठेवण्याची सूट रद्द केली होती. त्यावेळेस म्हटले होते की, ‘जर कोणत्या वापरकर्त्याच्या नावावर ९ हून अधिक सिम कार्ड काम करत असतील तर त्याला व्हेरिफिकेशन करावे लागले. ज्यासाठी ४५ दिवसांचा वेळ दिला गेला होता.’ याची अंतिम मुदत आज म्हणजे २० जानेवारी २०२२ रोजी समाप्त झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ज्या वापरकर्त्याच्या नावावर ९ पेक्षा जास्त सिम कार्ड काम करत असतील तर ते बंद केले जातील. (these sim cards will not work from today will stop incoming and outgoing calls)

हे सिम कार्ड्स केले जाणार बंद

DoT ने टेलिकॉम ऑपरेटर्सना आदेश दिले होते की, ‘ज्या वापरकर्त्याच्या नावावर ९ हून अधिक सिम कार्ड काम करत असतील. आणि जर या वापरकर्त्याने व्हेरिफिकेशन केले नाही तर अशा वापरकर्त्याच्या सिम कार्डचे ३० दिवसात आऊटगोइंग कॉल आणि ४० दिवसांत इन्कमिंग कॉल बंद केले जातील.’

शिवाय सिम ६० दिवसांत पूर्णपणे बंद करण्याचे आदेश ७ डिसेंबरला दिले होते. याशिवाय इंटरनॅशनल रोमिंग, आजारग्रस्त लोकं आणि दिव्यांग व्यक्तींसाठी ३० दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्याची घोषणा केली गेली होती.


हेही वाचा – YouTube Premiumचा वार्षिक प्लान भारतात लाँच, Ad free videos पाहण्यासाठी मोजावे लागतील ‘इतके’ पैसे


 

First Published on: January 20, 2022 2:58 PM
Exit mobile version